रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्स सोडण्याचे संकेत? घेतला चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय

IPL 2024 Mumbai Indians: इंडियन प्रिमिअर लीग 2024 ची सुरुवात यंदाच्या वर्षी 18 मार्चपासून होणार आहे. या पर्वाच्या आधी झालेला लिलाव, प्लेअर एक्सचेंज यासारख्या गोष्टी चर्चेत आहेत. त्यातच मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) घेतलेले काही निर्णय चाहत्यांमध्ये चांगलेच चर्चेत आहेत. मुंबई इंडियन्सने आधी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतलं. त्यानंतर रोहित शर्माला डच्चू देऊन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं आहे. मुंबईच्या संघातील या घडामोडींनी चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. अशातच संघात अंतर्गत धुसपूस असल्याची चर्चा आहे. हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय अनेकांना आवडलेला नाही. या निर्णयानंतर अनेक खेळाडू अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावरुन व्यक्त झाले आहेत. हा गोंधळ सुरु असतानाच आता चाहत्यांना आणखीन एक मोठा धक्का बसण्याचे संकेत मिळत आहेत. 

रोहितचा धक्का देणारा निर्णय

हार्दिकला कर्णधार करण्याच्या घोषणेनंतर मुंबई इंडियन्समध्ये 2 गट पडल्याची चर्चा आहे. काही खेळाडू हे रोहित शर्माशी प्रामाणिक असून त्यालाच कॅप्टन मानतात अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे. तर दुसरीकडे हार्दिक पंड्याच्या मागेही अनेक खेळाडू आहेत. मात्र या गोंधळात आता रोहितने एक टोकाचा निर्णय घेतला असून हा निर्णय चाहत्यांना धक्का देणारा आहे हे निश्चित. रोहितच्या या निर्णयानंतर तो मुंबई इंडियन्सची साथ सोडतो की काय अशीही चर्चा आहे. 

काय केलं रोहितने?

मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडून काढून हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांनी ही नाराजी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करुन व्यक्त केली आहे. लाखोंच्या संख्येनं फॉलोअर्स गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या हॅण्डलला आता रोहित शर्मानेही अनफॉलो केलं आहे. रोहित शर्मा सध्या ट्वीटरवर 43 जणांना फॉलो करतो. मात्र यामध्ये मुंबई इंडियन्सचा समावेश नाही. रोहित क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, महेंद्र सिंह धोनी, जॉस बटलर, भुवनेश्वर कुमार, अनिल कुंबळे, प्रग्यान ओझा, झहीर खान, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, ए. बी. डिव्हिलियर्ससारख्या खेळाडूंना फॉलो करतो. रोहितने मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं असलं तरी मुंबई इंडियन्स फॅन्स हे चाहत्यांचं व्हेरिफाइड अकाऊंट तो अजूनही फॉलो करतोय.

रोहित शर्माने अचानक मुंबई इंडियन्सचं मुख्य अकाऊंट अनफॉलो केल्याने तो संघ सोडण्याच्या तयारीत असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. मात्र दुसऱ्या एका दाव्यानुसार रोहित शर्माने खरोखरोच मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आहे की तो त्यांना फॉलोच करत नव्हता याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे. इन्स्टाग्रामवर रोहित शर्मा अजूनही मुंबई इंडियन्सच्या अकाऊंटला फॉलो करताना दिसत आहे.

सर्वात यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी आहे. त्याने 2013 पासून मुंबईला 5 वेळा आयपीएल चषक जिंकून दिला आहे. 2023 ला त्याच्या या विक्रमाची बरोबरी एम. एस. धोनीने चेन्नईला पाचव्यांदा चषक जिंकवून केली. 

2024-01-17T04:22:26Z dg43tfdfdgfd