नवी दिल्ली : रोहित शर्माच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर भारताने सुपर ओव्हरमधला सामना जिंकला. पण या विजयानंतर रोहित रोहित शर्माला भारतीय संघातून ब्रेक देण्यात आला आहे.
रोहित शर्मा हा सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्मात आहे. टी-२० मालिका रोहितने चांगलीच गाजवली. फक्त एकाच सामन्यात त्याने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवले. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. पण टी-२० सामन्यातील विजयानंतर रोहित शर्माला भारतीय संघातून ब्रेक देण्यात आला आहे. भारतीय संघामधूव विराट कोहलीलाही ब्रेक देण्यात आला आहे. पण विराट कोहलीला यावेळी राम मंदीराच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे त्याने हा ब्रेक घेतला आहे. पण रोहितला मात्र हे आमंत्रण नाही, पण तरीही रोहितला का ब्रेक देण्यात आला आहे, हा प्रश्न काही जणांना पडेलला आहे. नुकतीच तीन टी-२० सामन्यांची मालिका पार पडली, जी भारताने ३-० अशी जिंकली. त्यानंतर आता पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. टी-२० क्रिकेटमधून आता भारताला कसोटीच्या मानसीकतेमध्ये जावे लागणार आहे. पण ही कसोटी मालिका पाच सामन्यांची असल्यामुळे एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी त्यामध्ये जाणार आहे. एकदा मालिका सुरु झाली की रोहितला संघाला सोडता येणार नाही किंवा विश्रांती मिळू शकणार नाही. त्यामुळे या मालिकेपूर्वी रोहितला आपल्या कुटुंबियांबरोबर काही काळ वेळ व्यतित करायला मिळावा, यासाठी त्याला भारतीय संघातून थोडा ब्रेक देण्यात आला आहे. भारताचे काही खेळाडू पहिल्या कसोटीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत आणि त्यांनी सरावही सुरु केला आहे. पण रोहित मात्र सध्या संघाबरोबर नाही. रोहित सध्या आपल्या कुटुंबियांबरोबर काही वेळ व्यतित करणार असून तो संघामध्ये शनिवार किंवा रविवारी दाखल होणार आहे.
रोहित शर्मा हा भारताचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला फक्त सराव करून चालत नाही तर त्याला रणनितीही आखावी लागते. त्यामुळे एकदा संघात आल्यावर रोहितला आपल्या कुटुंबियांना द्यायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे रोहितला काही दिवसांचा ब्रेक देण्यात आलेला आहे.
2024-01-19T12:31:22Z dg43tfdfdgfd