नवी दिल्ली: भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे वर्ल्डकप २०२३ मधून बाहेर झाला आहे. १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक अखेरच्या साखळी सामन्यात किंवा सेमीफायनलमध्ये खेळू शकले असे वृत्त आले होते. पण आज शनिवारी हार्दिक वर्ल्डकपमधून बाहेर झाल्याचे समोर आले. आयसीसीने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिकच्या जागी जलद गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये हार्दिककडे उपकर्णधाराची जबाबदारी होते. त्याच बरोब तो संघातील महत्त्वाचा ऑलराउंडर देखील होता. त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. पण त्यामुळे संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्याच्या जागी संघात आलेल्या मोहम्मद शमीने धमाकेदार कामगिरी करून दाखवली.
वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर हार्दिक पंड्याने प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर लिहलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, ही गोष्ट पचवणे फार अवघड आहे की मी वर्ल्डकपमधील उर्वरील मॅच खेळू शकणार नाही. पण मी पूर्णपणे टीम सोबत असेन आणि प्रत्येक मॅचमधील प्रत्येक चेंडूवर त्यांना प्रोत्साहन देईन. सर्वांना माझ्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिब्यांसाठी धन्यवाद. ही टीम खास आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करतील.
बीसीसीआयने वर्ल्डकपसाठी स्टॅडबाय म्हणून ३ खेळाडूंना निवडले होते. त्यात तिलक वर्मा, विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन आणि जलद गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा समावेश होता. बीसीसीआयकडे या ३ पैकी एकाची निवड करण्याचा पर्याय होता. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड करण्याचे कारण म्हणजे हार्दिकच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीची सर्वाधिक कमतरता भासेल आणि स्टॅडबाय खेळाडूंमध्ये प्रसिद्ध एकमेव खेळाडू आहे जो फिट बसले. काही महिन्यांपूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर होता. पण त्याआधी तो वनडे क्रिकेटमध्ये भारताचा मुख्य गोलंदाज होता.
Read Latest Maharashtra News And Marathi News
2023-11-04T09:13:18Z dg43tfdfdgfd