नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फवाद अहमदवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. फवादच्या चार महिन्याच्या मुलाचे निधन झाले. जून महिन्यात फवादच्या पत्नीने त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिलाहोता. जन्मापासूनच तो आजारी होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते.फवादच्या मुलाला नेमके काय झाले होते हे कळू शकले नाही. मुलाच्या उपचारामुळे फवाद मेलबर्न येथील रॉयल चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये थांबला होता.
पाकिस्तानी वंशाचा फवाद ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. लेग स्पिनर फवाद अहमदने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. मुलाचा फोटो शेअर करताना तो म्हणतो, जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही माझ्या लिटिल एंजल. दुर्दैवाने एका मोठ्या संघर्षानंतर माझ्या मुळाचा एक वेदनादाई आणि अवघड अशी लढाईत पराभव झाला. मला वाटते की तू एका चांगल्या ठिकाणी आहेत. आम्हाला तुझी खुप आठवण येईल. मला आशा आहे की अशा दुःखातून कोणी गेले नसेल.
४१ वर्षीय फवादचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला होता. २०१० साली तो ऑस्ट्रेलियात आला आणि २०१३ साली त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ३ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. फवादने गेल्याच महिन्यात मुलाच्या प्रकृती संदर्भातील माहिती सर्वांना दिली होती. तेव्हा त्याने सोशल मीडियावरून म्हटले होते की, प्रामाणिकपणे सांगायचे तर हा फार कठीण काळ आहे. मला माहिती नाही की काय होणार आहे. डॉक्टरांना देखील काही माहिती नाही. हे फार वाईट आहे. एक अशी गोष्ट आहे जी मनाला बोचत आहे. ही अशी गोष्ट आहे जी अनपेक्षित होतेय.
फवादला १० वर्षापासून ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तो जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळत असतो. बिग बॅशच्या गेल्या हंगामात तो मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत होता.फवाद पीसीएल, सीपीएल आणि ग्लेबल टी-२० कॅनडा मध्ये खेळतोय. ३ वनडेत त्याने ३ विकेट तर दोन टी-२० मॅचमध्ये ३ विकेट घेतल्या आहेत.
Read Latest Sports News And Marathi News
2023-10-24T12:10:33Z dg43tfdfdgfd