विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आली वाईट बातमी, आता नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...

नवी दिल्ली : विराट कोहलीसारख्या अनुभवी खेळाडूची सध्याच्या घडीला भारतीय संघाला नितांत गरज आहे. कारण भारताने पहिला कसोटी सामना गमाला आहे आणि काही दिवसांतच आता दुसरी लढतही सुरु होणार आहे. कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळणार नाही, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. पण आता कोहलीच्या चाहत्यांसाठी अजून एक वाईट बातमी आली आहे.

विराट कोहली हा सध्याच्या घडीला भारतीय संघाला जास्त वेळ देत नसल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेत पोहोचल्यावरही तो काही कारणास्तव आपल्या घरी परतला होता आणि त्याला एका सामन्याला मुकावे लागले होते. त्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून बाहेर पडला होता. वैयक्तिक कारणास्तव त्याने माघार घेतली होती. त्यामुळे विराट आता तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात कमबॅक करेल आणि त्याला खेळाताना पाहता येईल, अशी आस त्याचे चाहते लावून बसले होते. पण आता विराटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. कारण विराट आता या संपूर्ण मालिकेत कदाचित खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबत बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. "पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतलेला विराट कोहली उर्वरित मालिकेत खेळण्याबाबतही संदिग्धता आहे. त्याच्या संघातील पुनरागमनाबाबत आम्ही अजून कोणतेही संकेत मिळत नाहीत किंवा त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही," असे भारतीय क्रिकेट बोर्डातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सध्याच्या घडीला विराट कोहलीच्या कमबॅकबाबत अजून बीसीसीायला देखील संदिग्धता आहे. कारण जर भारतीय संघात खेळायचे असेल तर त्याबाबत खेळाडू बीसीसीआयशी संपर्क साधत असतात आणि आपण उपलब्ध आहोत किंवा नाही हे काही दिवसांपूर्वीच कळवावे लागले. त्यानुसार संघाचा विचार केला जातो. पण कोहलीने याबाबत अजून बीसीसीआयला अजून काहीही कळवलेले नाही. त्यामुळे आता तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तीन सामने खेळणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आवेश खानला रणजी करंडक स्पर्धेतच खेळण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत 'अ' संघात वॉशिंग्टन सुंदरऐवजी मध्य प्रदेशचा फिरकी गोलंदाज सारांश जैन याचा समावेश करण्यात आला आहे.

2024-01-30T12:23:55Z dg43tfdfdgfd