विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, फक्त ३५ चेंडू केली मोठा कामगिरी

कानपूर : विराट कोहलीने दिग्गज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. विराटने यावेळी फक्त ३५ चेंडू खेळताना वर्ल्ड रेकॉर्ड तर आपल्या नावावर केला आहेच, पण त्याचबरोबर कोहलीच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली हा चांगल्या फॉर्मात नव्हता. विराटच्या बॅटला गंज लागलाय का, अशी टीका त्याच्यावर होत राहीली. टी २० वर्ल्ड कपपासून तो अपयशीच ठरत होता. पण कानपूरच्या दुसऱ्या कसोटीच मात्र विराटने इतिहास रचला आहे.

विराट कोहली यावेळी फलंदाजीला आला त्याने आक्रमक रुप धारण केल्यचाे पाहायला मिळाले. विराटने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फटकेबाजी केली. यावेळी विराटला ऋषभ पंतबरोबर फलंदाजी करत असताना जीवदानही मिळाले. पण त्यानंतर मात्र कोहलीने तुफानी फटकेबाजी केली. त्यामुळे जिथे कोहलीच्या धावा होत नव्हत्या, तिथे कोहलीने वादळी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. विराटने यावेळी फक्त ३५ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४७ धावा केल्या आणि एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

सचिन तेंडुलकरच्या नावावर एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड होता. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. पण सचिनने २७ हजार धावांचा टप्पा हा ६२३ डावांमध्ये पूर्ण केला होता. पण विराटने सचिनचा हा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. कारण विराटने या सामन्यात २७ हजार धावांचा पल्ला पार केला. यावेळी विराटने हा पल्ला पूर्ण करण्यासाठी ५९४ डाव घेतले, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २७ हजार धावा पूर्ण करण्याचा इतिहास आता विराटने रचला आहे.

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पल्ला चार खेळाडूंना ओलांडता आला आहे. यामध्ये विराट व सचिनसह कुमार संगकारा आणि रिकी पॉन्टिंग यांचा समावेश आहे. पण सर्वात जलद २७ हजार धावा या विराट कोहलीने पूर्ण केल्या आहेत.

विराट कोहलीचे अर्धशतक या सामन्यात फक्त तीन धावांनी हुकले. पण विराट कोहलीने यावेळी ऐतिहासिक कामगिरी करत संपूर्ण क्रीडा विश्वाला आपली नोंद घ्यायला भाग पाडले आहे. त्यामुळे आता हा वर्ल्ड रेकॉर्ड कोहलीच्या नावावर असणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-30T14:01:24Z dg43tfdfdgfd