कानपूर : विराट कोहली दुसरा कसोटी सामना सुरु असताना जेव्हा फलंदाजीला आता तेव्हा काही जणांना आश्चर्य वाटले. पण यावेळी भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक यांनी तर स्पष्टपणे आपले मत मांडले. कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावा केल्या आहेत, हे सांगत असताना सुनील गावस्कर चांगलेच भडकले होते.
विराट कोहलीने गेले शतक कधी केले, हे कदाचित कोणाला आठवणार नाही. कारण कोहली बऱ्याच काळापासून अपयशी ठरताना दिसत आहे. टी २० वर्ल्ड कपपासून तो सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच त्याने शतक कधी झळकावले, हे आता कोणालाही आठवत नसेल. श्रीलंकेच्या दौऱ्यात तो अपयशी ठरला होता. पहिल्या कसोटीतही त्याला धावा करता आल्या नाहीत. पण दुसऱ्या कसोटीत मात्र त्याने ४७ धावांची खेळी साकारली. पण यावेळीही त्याला जीवदान मिळाले.
यशस्वी जैस्वाल ७२ धावांवर बाद झाला आणि सर्वांनाच आतुरता होती ती विराट कोहलीची. त्यामुळे मैदानातील चाहते कोहलीची वाट पाहत होते. पण त्यावेळी कोहली फलंदाजीला आला नाही. कारण कोहली कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. पण यावेळी मात्र कोहलीच्या जागी चौथ्या स्थानावर ऋषभ पंतला पाठवण्यात आले. त्यावेळी सुनील गावस्कर चांगलेच भडकले होते. गावस्कर यांना सुरुवातीला आश्चर्य वाटले की, विराट कोहलीच्या जागी ऋषभ पंतला का पाठवण्यात आले आहे. पण त्यानंतर मात्र गावस्कर यांनी आपले मत व्यक्त केले.
सुनील गावस्कर यावेळी म्हणाले की, " विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला न आलेला पाहणे हे आश्चर्यकारक आहे. कारण तुम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलताय ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा पल्ला गाठलेला आहे." विराट कोहलीला पाचव्या क्रमांकावर पाठवणे हे गावस्कर यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला चांगलेच फटकारले आहे.
भारतीय फलंदाज सुरुवातीपासून आक्रमक खेळत होते. पण यावेळी चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंतला बढती देण्यात आली आणि विराट कोहलीला पाचव्या स्थानावर पाठवण्यात आले. ही गोष्ट सुनील गावस्कर यांच्या पचनी पडलेली नाही.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-30T16:16:24Z dg43tfdfdgfd