श्रीलंकेचे कोच झाले टीम इंडियाचे फॅन, सामन्याआधी खेळाडूंच्या कौतुकाचे बांधले पूल; पाहा नेमकं काय म्हणाले

मुंबई : विश्वचषकात आज भारत आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत. भारताने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे, तर श्रीलंकेसाठी दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाहीत. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली. श्रीलंकेकडून त्यांचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरहूड यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तर भारताकडून कर्णधार रोहित शर्मा स्वतः प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार होता. यावेळी विरोधी प्रशिक्षकाने भारतीय खेळाडूंचे कौतुक करताना त्यांना जणू झाडावरच चढवले.

भारताने दिलेली ती जखम

श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांना आशा आहे की कोलंबो येथे झालेल्या आशिया कप फायनलमध्ये भारताकडून झालेल्या दारुण पराभवातून त्यांचा संघ धडा घेईल. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला ५० धावांत गुंडाळले आणि १० गडी राखून मोठा विजय मिळवला. सिल्व्हरहुड म्हटले की, जगातील कोणत्याही संघाला अशा प्रकारचे गोलंदाजी आक्रमण हवे असते.

भारताविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला सिल्व्हरवुड म्हणाले, 'तुम्ही या गोलंदाजी आक्रमणाकडे पाहिले आणि त्यांना गोलंदाजी करताना पाहिले, तर ते खूप मजबूत आक्रमण असल्याचे दिसते. खरे सांगायचे तर, जगातील कोणत्याही संघाला अशा प्रकारचे गोलंदाजी आक्रमण हवे असते. आम्ही आमच्या खेळाडूंसाठी हे एक मोठे आव्हान म्हणून पाहत आहोत. जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणाचा सामना करत आहोत. पण भारताचे एक अतिशय मजबूत गोलंदाजी आक्रमण आहे हे कोणापासून लपलेले नाही."

तर दुसरीकडे रोहित शर्माची पत्रकार परिषद सुरु होती आणि त्याची उत्तरे ऐकून हशा पिकणार नाही असे शक्यच नाही. त्याच्या फलंदाजीविषयी बोलताना रोहित नेमकं काय म्हणाला पाहा. भारतीय कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्मात आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने कठीण परिस्थितीत खेळपट्टीवर टिकून महत्त्वाची खेळी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला की मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे पण परिस्थितीही लक्षात घेत आहे.

त्याच्या फलंदाजीसंबंधित प्रश्नावर तो म्हणाला, 'मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे, पण साहजिकच संघ आणि परिस्थिती लक्षात घेऊन. विचार न करता क्रीझवर जाऊन फलंदाजी करावी लागते, असे नाही. मला फलंदाजीचा चांगला वापर करून संघाला चांगल्या स्थितीत उभे करायचे आहे. या मानसिकतेने मी फलंदाजीला उतरतो."

2023-11-02T03:54:40Z dg43tfdfdgfd