गोपाळ गुरव : अर्जुन पुरस्कार विजेता भारताचा हॉकीपटू वरुणकुमारवर ‘पोक्सो’ अंतर्गत बेंगळुरू पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने तक्रार दिली आहे. अल्पवयीन असताना वरुणकुमारने आपल्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
२२ वर्षीय महिलेने सोमवारी याबाबत तक्रार दाखल केली आहे. ‘मी २०१८मध्ये सोशल मीडियाद्वारे वरुणच्या संपर्कात आले होते. त्या वेळी मी सतरा वर्षांची होते. वरुणने लग्नाचे आमीष दाखवून माझ्यावर अनेक वेळा बलात्कार केला,’ असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. वरुणला भेटले त्या वेळी तो बेंगळुरूच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात सराव करीत होता, असेही या महिलेने म्हटले आहे. वरुणला २०२१मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नुकतीच त्याला पंजाब पोलिसात पोलिस उपअधिक्षक पदावर बढती मिळाली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवी कलम ३७६ (बलात्कार) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरुणचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये राखीव खेळाडूमध्ये समावेश करण्यात आला होता. सध्या तो आगामी एफआयएच प्रो-लीग हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघासोबत भुवनेश्वर येथे सराव करीत आहे. या स्पर्धेत भारताची सलामीची लढत १० फेब्रुवारीला स्पेनविरुद्ध होणार आहे. वरुण भुवनेश्वरमधून पळून गेल्याची अफवाही पसरली होती. मात्र, ‘हॉकी इंडिया’ने हे वृत्त फेटाळून लावले आहे. वरुण हिमाचल प्रदेशातील असून, त्याने २०१७मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले आहे.
महिलने तक्रारीत म्हटले आहे, की जुलै २०१९मध्ये वरुण मला बेंगळुरूतील जयनगर येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने माझ्याशी पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्तापित केले. त्या वेळी मी सतरा वर्षांचे होते. नंतर त्याने मला लग्नाचे आमीष दाखवले. यानंतर पाच वर्षे आम्ही रिलेशनशीपमध्ये होतो. यादरम्यान त्याने माझ्यावर वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. मागे मी एकदा त्याला पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती. त्या वेळी त्याने पुन्हा लग्नाचे वचन दिले होते. यानंतर मी लग्नाचा दबाव टाकल्यावर त्याने माझे नको ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली होती.
2024-02-06T17:33:43Z dg43tfdfdgfd