IND VS ENG : भारताची सेमी फायनल पावसामुळे होणार की नाही, दिनेश कार्तिकने लाइव्ह व्हिडिओसह दिले अपडेट्स...

गयाना : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना खेळवला जाणार की पावसामुळे रद्द होणार, हा सध्याच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न आहे. पण यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक हा वेस्ट इंडिजमध्येच आहे आणि त्याने एक खास व्हिडिओ शेअर करत अपडेट्स दिलेले आहेत.

भारत आणि इंग्लंडच्या सेमी फायनल सामन्यात पावसाला सर्वात जास्त महत्व मिळाले आहे. कारण या सामन्यात ७० टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हा सामना जिथे होणार आहे तिथे सकाळी पाऊस पडला होता. पण सामना सुरु होण्याच्या काही वेळापूर्वी दिशेन कार्तिकने एक मैदानाचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्याच्या घडीला वेस्ट इंडिजमध्ये कसे वातावरण आहे, हे आता समोर आले आहे.

दिनेशने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये मैदानात कव्हर्स टाकण्यात आलेले दिसत आहे. मैदानाचा जो भाग झाकलेला नाही तिथे पाणी जमा झालेले दिसत आहे. या सामन्याची अपडेट देताना दिनेश म्हणाला की, " सध्या तरी मैदानातील चित्र आशादायक दिसत नाही. कारण सकाळी जोरदार पाऊस पडला आहे आणि काही वेळापूर्वी रिमझिम पाऊस पडत होता. पण या सर्व परिस्थितीत एक आनंददायी गोष्टदेखील आहे आणि ती म्हणजे आता सूर्याने डोके वर काढले आहे. त्यामुळे चांगला सूर्यप्रकाश मैदानात पाहायला मिळत आहे."

वेस्ट इंडिजमध्ये सध्याच्या घडीला जोरदार पाऊस आहे आणि जिथे सामना होणार आहे तिथे तर सकाळपासून जबरदस्त पाऊस पडला आहे. त्यामुळे मैदानातील कव्हर्सही अजून काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा सामना वेळेवर सुरु होईल, याची शक्यता कमी आहे. पण जर सूर्य तळपला तर नक्कीच हा सामना होू शकतो.

भारत आणि इंग्लंडच्या सामन्यात पाऊस पडणार हे निश्चित समजले जात होते. पण तरीही या सामन्याला राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळे हा सामना जर रद्द झाला तर दोन्ही संघांना समान १ गुण मिळेल, असे आता समोर येत आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-27T13:19:29Z dg43tfdfdgfd