RAVINDRA JADEJA : 'माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी...', वडिलांच्या आरोपावर रवींद्र जडेजाचं चोख प्रत्युत्तर!

Ravindra jadeja Tweet on father Anirudhsinh Accusation : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) याचा कौटुंबिक कलह आता चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. रवींद्र जडेजाचे वडिल अनिरुद्धसिंह जडेजा (Anirudhsinh jadeja) यांनी रवींद्र आणि त्याची पत्नी रिवाबा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे क्रिडाविश्वास अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. आमदार सुनेवर झालेल्या आरोपानंतर आता रवींद्र जडेजाने ट्विट करत वडिलांच्या आरोपांवर (Ravindra Jadeja family dispute) उत्तर दिलं आहे. 

रवींद्र जडेजाचे वडील काय म्हणाले?

माझा रवींद्र जाडेजा अथवा त्याच्या पत्नीसोबत कोणताही संबंध नाही. ना ते मला कधी फोन करतात ना मी त्यांना फोन करतो. लग्नानंतर आम्ही एकत्र राहत नाही. लग्नाच्या तीन महिन्यानंतरच वादाला सुरूवात झाली होती. सध्या जामनगरमध्ये मी एकटाच राहतो. रवींद्र जडेजा आणि रिवाबा माझ्यापासून वेगळे राहतात. रविबाने त्याच्यावर काय जादू केली माहित नाही. माझ्या मुलाने असं केल्याने मला खूप वाईट वाटतंय. मी त्याचं लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. मी त्याला लहानपणी क्रिकेट शिकवायला नको होतं. मी त्याला खेळू दिलं नसतं तर कमीतकमी आम्ही या परिस्थितीत तरी राहिलो नसतो, असं म्हणत रवींद्र जडेजाच्या वडिलांना भावना अनावर झाल्या होत्या. 

वडिलांच्या या आरोपानंतर रवींद्र जडेजाने ट्विट करत या आरोपांवर उत्तर दिलंय. एका मुलाखतीत केले गेलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व आरोप खोटे असून चुकीचे देखील आहेत, असंही रवींद्र जडेजा म्हणतो. काही गोष्टी अर्धसत्य आहेत. मी यावर स्पष्टपणे आरोपांचं खंडन करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे निंदनीय आणि अशोभनिय आहे. माझ्याकडे देखील सांगण्यासारखं खूप काही आहे अन् मी ते सार्वजनिकरित्या सांगण्याचा प्रयत्न केला नाही, असं रवींद्र जडेजा म्हणाला आहे.

दरम्यान, दरम्यान, 17 एप्रिल 2016 मध्ये शाही राजकोटमध्ये जडेजाचं लग्न रिवाबासोबत झालं होतं. जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा सध्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. 8 डिसेंबर 2022 रोजी त्या आमदार म्हणून निवडून आल्या. नुकताच तो इंग्लंडविरुद्धच्या संघात खेळताना दिसला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

2024-02-09T10:44:50Z dg43tfdfdgfd