श्रीलंका आणि न्यूझीलंडधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसराही सामना श्रीलंकेने आपल्या खिशात घातला आहे. श्रीलंका संघाने दुसऱ्या कसोटीमध्ये किवींचा एक डाव आणि 154 धावांनी पराभव केला. हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पार पडला. पहिल्या डावात ऑल आऊट करत फॉलो ऑन दिलेल्या न्यूझीलंड संघाचा डाव 360 धावांवर आटोपला. पहिला कसोटी सामना 63 धावांनी जिंकला होता. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंका संघाने न्यूझीलंडचा 2-0 ने सुफडा साफ केलाय. या विजयासह श्रीलंका संघाने तब्बल 15 वर्षांनी न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. याआधी 2009 साली श्रीलंकेने न्यूझीलंडचा 2-0 ने पराभव करत कसोटी मालिका जिंकली होती.
दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये श्रीलंकेने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावामध्ये 602-5 धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंका संघाकडून कामिंदु मेंडिस याने 250 चेंडूत 182 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 16 चौकार आणि 4 षटकार मारले होते. त्यासोबतच दिनेश चांदिमल याने 208 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी केली. तर श्रीलंका संघाचा अनुभवी खेळाडूने मॅथ्यूज यानेही महत्त्वपूर्ण 88 धावा केल्या होत्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला न्यूझीलंडचा संघ अवघ्या 88 धावांवर ऑल आऊट झाला. प्रभात जयसूर्या याच्या फिरकीसमोर किवींनी नांगी टाकली. जयसूर्या याने 18 ओव्हरमध्ये 42 धावा देत न्यूझीलंडच्या सहा विकेट घेत खिंडार पाडलं.
दुसऱ्या डावातही बॅटींगसाठी आलेल्या किवींची सुरूवात एकदम खराब झाली. शून्यावर न्यूझीलंडने आपली पहिली विकेट गमावली होती. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि केन विल्यमसन यांनी डाव सावरला. मात्र कर्णधार धनंजया डी सिल्वाने कॉनवेला 61 धावांवर असताना आऊट करत दुसरा धक्का दिला. या विकेटने पुन्हा किवींचा डाव गडगडला 97-2 वरून थेट 121-5 अशी बिकट अवस्था झाली. त्यावेळी टॉम ब्लंडेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी दमदार भागीदारी केली. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली होतीत, टॉम ब्लंडेल याला 60 धावांवर निशान पेरिस याने आऊट करत हो जोडी फोडली. त्यानंतर मैदानात आलेल्या सँटनर याने मैदानात तळ ठोकला. मात्र फिलिप्स 78 धावांवर असताना त्याला पेरीस याने आऊट केलं. फिलिप्स गेल्यावर एका बाजूने गळती लागली. सँटनेर यानेही फिलिप्सला चांगली साथ दिली, सँटनरनेही 115 चेंडूत 67 धावा करत झुंजार अर्धशतकी खेळी केली.
A thumping win for Sri Lanka in Galle 💪#WTC25 | #SLvNZ 📝: https://t.co/MBQXWEOCeW pic.twitter.com/Uo6TmIdocc
— ICC (@ICC) September 29, 2024 ]]>दरम्यान, दुसऱ्या डावात श्रीलंका संघाकडून निशान पेरिस याने सहा विकेट घेतल्या. तर पहिल्या डावामध्ये सहा विकेट घेणाऱ्या प्रभात जयसूर्याने तीन विकेट घेत त्याला योग्य साथ दिली. या कसोटी सामन्यानंतर कामिंदु मेंडिस याला सामनावीर तर प्रभात जयसूर्या याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम साउथी (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओरूरके
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (विकेटकीपर), मिलन प्रियनाथ रथनायके, प्रभात जयसूर्या, निशान पेरिस, असिथा फर्नांडो
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-29T10:00:50Z dg43tfdfdgfd