कानपूर: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीतील २ दिवस पावसामुळे खेळ झाला नाही. आज चौथ्या दिवशी भारताने बांगालादेशचा डाव २३३ धावांवर संपुष्ठात आणला. त्यानंतर टीम इंडियाने फ्कत ३५ षटकात आक्रमक फलंदाजी करत ९ बाद २८५ धावांवर डाव घोषित केला.
भारताने डावाला सुरुवात केली तेव्हा कसोटीचा फक्त दीड दिवसाचा खेळ शिल्लक होता. त्यामुळे टीम इंडियाने आक्रमक फलंदाजीची रणनिती वापरली. कसोटीच्या चौथ्या दिवशी अशी एक घटना घडली ज्याची चर्चा सोशल मीडियापासून सर्व क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू आहे.
भारतीय डावाच्या १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर विराट कोहला धावबाद करण्याची सुवर्णसंधी बांगलादेशकडे होती. मात्र त्यांनी ती अशा पद्धतीने वाया घालवली की सर्व जण हैराण झाले. गोलंदाज खालिद अहमदने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या दिशने आला होता. हा स्लोअर चेंडूवर विराटने ड्राइव्ह मारला, मात्र चेंडू बॅटच्या आतल्या भागात लागून विराटच्या पॅडला लागतो. दरम्यान विराट एक चोरटी धावा घेण्याचा प्रयत्न करतो. ही धाव घेण्यासाठी विराट बराच पुढे येतो. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला उभा असलेला ऋषभ पंत त्याला माघारी पाठवतो.
विकेटच्या जवळ असलेला चेंडू आणि विकेटपासून बराच लांब असलेला विराट कोहली आणि या दरम्यान असलेला गोलंदाज खालिद अहमदकडे इतका वेळ होता की तो सहज विराटला धावबाद करेल. चेंडू आणि विकेटचे अंतर देखील फार कमी होते. खालिदने चेंडू उचलला आणि अंडर आर्म थ्रो केला मात्र घाईत चेंडू विकेटला लागलाच नाही. विशेष म्हणजे खालिदने जेव्हा चेंडू विकेटवर मारण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा विराटने वाचण्याची आशाच सोडून दिली होती.पण चेंडू विकेटला लागला नाही आणि विराट पुन्हा क्रिझमध्ये परतला.
विराटने क्रिझवर येत पंतला विचारणा केली. दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा विकेटकीपर खालिदच्या मीस थ्रोवर वैतागलेला दिसला. तर पंत विराट जवळ आला आणि त्याने माफी मागितली. झालेल्या प्रकारावर मात्र विराट आणि पंतला हसू आवरता आले नाही. विशेष म्हणजे विराट तेव्हा फक्त २ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने दमदार फलंदाजी करत ३५ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारासंह ४७ धावा केल्या.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-09-30T13:01:19Z dg43tfdfdgfd