ऋषभ पंत आयपीएल खेळणार पण टी-२० वर्ल्ड कप का नाही, जाणून घ्या खरं कारण आहे तरी काय....

नवी दिल्ली : ऋषभ पंत आता आयपीएल खेळण्यासाठी फिट झाला आहे. बीसीसीआयने तशी माहितीही दिली आहे. पण पंत आयपीएल खेळणार असला तरी तो टी-२० वर्ल्ड कप मात्र खेळू शकणार नाही, अशी माहिती आता समोर येत आहे. पण पंत जर आयपीएल खेळू शकतो तर टी-२० वर्ल्ड कप का नाही, याचे कारण आता समोर आले आहे.

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत तंदुरुस्त झाला असून, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) फलंदाजीसह यष्टिरक्षणही करू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे तो आता आगामी टी-२० वर्ल्ड कपही खेळू शकणार नाही. आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. महंमद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा मात्र आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीत. लोकेश राहुलबद्दल पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही.

चौदा महिन्यांपूर्वी पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यातून सावरल्यानंतर त्याने तंदुरुस्तीवर मेहनत घेतली. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतो. गेल्या मोसमात तो खेळू शकला नव्हता. या वेळी तो केवळ फलंदाजी करू शकेल, असे सुरुवातीला प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी म्हटले होते. मात्र, मागील काही काळापासून तो यष्टिरक्षणाचाही कसून सराव करीत होता. पण तो आयपीएलमध्ये यष्टीरक्षण करणार नसल्याचे समजते आहे.. काही दिवसांपूर्वी बेंगळुरूत त्याने एक सराव सामनाही खेळला. 'पंतचा उत्तराखंड जवळ ३० डिसेंबर २०२२ला अपघात झाला होता. यात तो थोडक्यात बचावला. मागील चौदा महिन्यांपासून तो यातून सावरत होता आणि पूनर्वसन कार्यक्रमात सहभागीही झाला होता. आता आम्ही त्याला आयपीएलसाठी तंदुरुस्त घोषित करीत आहोत,' असे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टी-२० वर्ल्ड कप जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळला जाणार आहे. आयपीएलमध्ये खेळून त्याला आपला फॉर्म परत मिळवता येणार आहे. एका कार्यक्रमात बोलताना पंत म्हणाला, 'मी डॉक्टरांना विचारले होते, की मला तंदुरुस्त व्हायला किती वेळ लागेल. मला वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी माहिती मिळते आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले होते, की किमान १६ ते १८ महिने लागतील. मग मीच डॉक्टरांना म्हणालो, की तुम्ही सांगाल त्याच्या सहा महिने आधी मी तंदुरुस्त होईल.' आठवड्यापूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्याने अकादमीतील सर्व तंदुरुस्ती चाचणी यशस्वी पार पाडल्या होत्या.

बीसीसीआयने पंतपुढे नेमकी कोणती अट ठेवली आहे, जाणून घ्या...

"पंत वर्ल्ड कपमध्ये खेळला तर आमच्यासाठी चांगलेच आहे. भारतीय संघाचा तो महत्त्वाचा खेळाडू आहे. तो यष्टिरक्षण करू शकला, तर तो वर्ल्ड कप खेळू शकेल. अर्थात, तो आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो तेदेखील महत्त्वाचे आहे," असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले.

पंत आयपीएलमध्ये खेळणार असला तरी तो यष्टीरक्षण करणार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच त्याला टी-२० वर्ल्ड कपमध्येही खेळता येऊ शकणार नाही.

2024-03-13T07:57:09Z dg43tfdfdgfd