धोनीने मनं जिंकली पण सामना गमावला, पहिला विजय साकारत दिल्ली आणि पंत ठरले सरस

विशाखापट्टणम : महेंद्रसिंग धोनी फलंदजीला आला. धोनीने १६ चेंडूंत ३७ धावांची खेळी साकारली. धोनीने यावेळी सर्वांची मनं जिंकली पण त्याला चेन्नईला हा सामना जिंकवता आला नाही. डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १९१ धावा उभारल्या. दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर अजिंक्य रहाणेने ४५ धावांची खेळी साकारत संघाला सावरले. पण तो बाद झाला आणि चेन्नईचा संघ अडचणीत आला. धोनीने संघाला जिंकवण्याचा प्रयत्न केला खरा, पण चेन्नईला २० धावांनी पराभव पत्करावा लागला,

दिल्लीच्या १९२ धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले, त्यामुळे त्यांची २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. पण त्यावेळी अजिंक्य रहाणे संघाच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्यने यावेळी डॅरिल मिचेलला आपल्या साथीला घेतले आणि त्याने दिल्लीच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात. मिचेलबरोबर अजिंक्यने तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली, मिचेल यावेळी ३४ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर अजिंक्यच्या साथीला आला तो शिवम दुबे. अजिंक्य आणि दुबे यांनी काही वेळ चेन्नईचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर अजिंक्य रहाणे ४५ धावांवर बाद झाला आणि चेन्नईला मोठा धक्का बसला. त्यानंतरच्या चेंडूवरच समीर रिझवी पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याला भोपळाही फोडता आला नाही.

दिल्लीच्या संघाची रणनिती या सामन्यात योग्य ठरत असल्याचे पाहायला मिळाले. कारण दिल्लीने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर पृथ्वी सावला संघात स्थान दिले आण त्याने संघाला दमदार सुरुवात करून दिली. दिल्लीला यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि अजिंक्य रहाणे यांनी ९३ धावांची सलामी करून दिली. वॉर्नरने यावेळी ३५ चेंंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. पण वॉर्नर बाद झाल्यावर काही वेळात पृथ्वीही तंबूत परतला. पृथ्वीने यावेळी २७ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावा केल्या. पृथ्वी आणि वॉर्नरसारखे दोन मोठे सेट झालेले फलंदाज बाद झाले. त्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत आला, असे वाटत होते. पण त्यावेळी ऋषभ पंतने कर्णधाराला साजेशी धडाकेबाज खेळी साकारली. पंतने यावेळी ३२ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावा करता आल्या.

पंतने अखेरच्या षटकांमध्ये धमाकेदार फटकेबाजी केली. त्यामुळेच दिल्लीच्या संघाला १९१ धावांचा डोंगर उभारता आला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-31T18:11:45Z dg43tfdfdgfd