नवीन भूमिकेनंतर आता धोनीचे आयपीएलबाबत मोठं विधान, म्हणाला परदेशी खेळाडू...

चेन्नई : महेंद्रसिंग धोनीने आपल्या नवीन भूमिकेबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्यानंतर आता धोनीने आयपीएलबाबत आता एक मोठे वक्तव्य केले आहे.

धोनीने नवीन भूमिकेबाबत काय पोस्ट केली होती...

धोनीने सोमवारी फेसबूकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये धोनीने लिहिले होते की, " नव्या मोसमात नवीन भूमिकेसाठी मी सज्ज आहे." आता आयपीएलचा नवा मोससम सुरु होत आहे. त्यामुळे धोनी यावेळी कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. काही जणांना धोनी हा आता चेन्नई सुपर किंग्सचा मार्गदर्शक बनणार असल्याचे म्हटले जात आहे. धोनीने ही पोस्ट केल्यावर आता एक मोठे वक्तव्यही केले आहे.

धोनी नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या...

धोनी यावेळी म्हणाला की, " जेव्हा २००८ साली आयपीएलला सुरुवात झाली तेव्हा आमच्या संघात मॅथ्यू हेडन, माइक हसी, मुथय्या मुरलीधरन, जेकब ओरम आणि मखाया एन्टिनीसारखे मातब्बर परदेशी खेळाडू होते. पण ते विविध देशांतील होते. पण यावेळी ते एकाच ड्रेसिंग रुममध्ये बसणार होते. त्यामुळे माझ्यासाठी या सर्वांशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान होते. पण जर एकमेकांना समजून घेॉतले तर सर्व काही सुरळीत होते, हा माझा विश्वास होता. त्यामुळे तुम्ही एका व्यक्तीला ओळखले की, त्याची बलस्थाने आणि कच्चेदुवेही आपल्याला समजतात. त्यामुळे तुम्हाला त्या खेळाडूसाठी कुठे मेहनत घ्यायची आहे, हे तुम्हाला समजते. त्यामुळे तुमचे काम हलके होऊन जाते. मी भारताकडून खेळताना प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी जास्त बोलायचो नाही. पण आयपीएलमुळे मी परदेशी खेळाडूंशी बोलायला लागलो, त्यांच्याशी संवाद साधायला लागतो. त्यामुळे परदेशी खेळाडूंचाही संघामधील यशाचा वाटा मोठा आहे, असे मला वाटते."

धोनीने आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंची भूमिका किती महत्वाची आहे, हे आता सांगितले आहे. त्यामुळे कदाचित चेन्नईचा पुढचा कर्णधार हा परदेशी खेळाडू असू शकतो, असेही तर्क आता लावले जात आहेत.

2024-03-05T10:35:49Z dg43tfdfdgfd