पाकिस्तानच्या गद्दार क्रिकेटपटूला धडा शिकवला; UAE क्रिकेट बोर्डाने केली मोठी कारवाई

नवी दिल्ली: जगभरात असे अनेक देश आहेत ज्यांच्या क्रिकेट संघात अन्य देशांचे क्रिकेटपटू खेळतात. अशा देशांमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाचा समावेश आहे. या देशाच्या क्रिकेट संघात फक्त त्यांचे नाही तर पाकिस्तान, भारताचे खेळाडू मोठ्या संख्येने खेळत असतात. पण अशाच एका खेळाडूने UAE बोर्डाला धोका दिल्याने आता त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानचा क्रिकेटपटू उस्मान खान याला देशाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळत नव्हेत म्हणून तो युएईमध्ये गेला. तेथील क्रिकेट बोर्डाने त्याला संधी देत एक वर्षाचा करार केला. बोर्डला त्याच्याकडून अपेक्षा होती की तो युएईकडून क्रिकेट खेळले आणि मॅच जिंकून देईल. पण उस्मानच्या मनात वेगळेच काही सुरू होते.

उस्मान खान पाकिस्तान लष्कराकडून सुरू असलेल्या कॅम्पमध्ये सहभागी झाला. त्याच्या या कृतीवर संतापलेल्या युएई क्रिकेट बोर्डाने कारवाई करत ५ वर्षाची बंदी घातली. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवीने हे स्पष्ट केले की, उस्मान खानला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी राष्ट्रीय संघात घेतले जाऊ शकते. तो संघात सहभागी होण्याच्या शर्यतीत आहे. पाकिस्तान लष्कराकडून नुकत्याच झालेल्या २९ खेळाडूंच्या फिटनेस कॅम्पमध्ये उस्मानने भाग घेतला होता.

अमीरात क्रिकेट बोर्डाने गेल्या आठवड्यात त्याच्यावर पाच वर्षाची बंदी घातली. २८ वर्षीय उस्मानने बोर्डाच्या नियमांचे उल्लंखन केल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार नकवी यांनी सांगितले की, उस्मान पाकिस्तानकडून खेळू शकतो.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-08T15:39:50Z dg43tfdfdgfd