पदार्पणातच क्वेना माफाकाच्या नाव दोन विक्रम, एक चांगला तर वाईट गोलंदाजीमुळे घसरला क्रम

हैदराबादच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजहैदराबादच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाला त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये संधी दिली. संघात प्रवेश करताच मफाकाच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला. सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये प्रवेश करणारा तो तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या सामन्यात त्याने घसघशीत रन्स खर्च केले आहेत. हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने माफाकाच्या दुसऱ्या षटकात दोन षटकार आणि दोन चौकारांसह २२ धावा केल्या. तरुण खेळाडूचे हे षटक संघासाठी महागडे ठरले.

सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये पदार्पण करणारे खेळाडू

आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण परदेशी खेळाडू १७ वर्षे, ११ दिवस - मुजीब उर रहमान (पंजाब वि. दिल्ली, २०१८) १७ वर्षे, २८३ दिवस - संदीप लामिछाने (दिल्ली विरुद्ध बेंगळुरू, २०१८) १७ वर्षे, ३५४ दिवस - क्वेना माफाका (मुंबई, हैदराबाद २०२४) १८ वर्षे, १०३ दिवस - नूर अहमद (गुजरात वि. राजस्थान, २०२३) १८ वर्षे, १७० दिवस - मिचेल मार्श (डेक्कन चार्जर्स विरुद्ध बेंगळुरू, २०१०)

क्वेना माफाका कोण आहे?

दक्षिण आफ्रिकेच्या माफाकाने अद्याप कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही पण या १७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत ९.७१ च्या सरासरीने २१ विकेट घेतल्या आणि त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. बांगलादेशचा एनामुल हक ज्युनियर २२ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. माफाकाने अंडर- १९ विश्वचषकातही अनोखा विक्रम केला. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक वेळा ५ बळी घेणारा गोलंदाजही तो ठरला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ५/३८, झिम्बाब्वेविरुद्ध ५/३४ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६/२१ अशी कामगिरी केली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T05:18:21Z dg43tfdfdgfd