प्रीती झिंटाने रोहित शर्माचे एका वाक्यात केलं कौतुक, पाहा असं नेमकं म्हणाली तरी काय...

मुंबई : रोहित शर्मा हा जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे. सध्याच्या घडीला त्याच्यावर फॉर्म काहीसा रुसला आहे, पण त्यामुळे त्याची महानता कमी होत नाही. आयपीएल ऐन रंगात आली असताना पंजाब किंग्सची मालकीण व बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटानेही रोहितचे एका वाक्यात कौतुक केले आहे. सोशल मीडियावर एका क्रिकेटप्रेमीने रोहितबद्दल एका वाक्यात उत्तर द्यायला सांगितले. त्यावर प्रीतीने एका वाक्यात सर्वांची मनं जिंकली आहेत.

मुंबईचे अनेक खेळाडू यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्याचसोबत रोहित ही आपल्या खेळाद्वारे संघाच्या खेळाडूंचे मनोबल वाढवू शकला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईने १२ सामन्यांपैकी ४ सामन्यातच विजय मिळविला आहे. सोमवारी हैदाराबादला मुंबईने पराभूत केले आणि ते नवव्या स्थानावर पोहोचले आहेत. यंदाच्या हंगामात हार्दिकला कर्णधाराची जबाबदारी दिली आहे त्याचा परिणाम आपल्याला संघातील सामन्यात दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे एकिकडे हार्दिक पंड्या ट्रोल होत असताना रोहित शर्माला मात्र चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रीती झिंटानेही एकाच वाक्यात रोहितचे कौतुक करताना सर्वांची मनं जिंकली आहेत.

प्रीती झिंटाला सोशल मीडियावर एका चाहत्याने प्रश्न विचारला की, "रोहित शर्माबद्दल तु एका वाक्यात काय सांगशील, मला प्लीझ रिप्लाय करा" प्रीती झिंटाने यावेळी आपल्या फॅनला नाराज केले नाही. प्रीतीने एका वाक्यात रोहितबद्दल जे काही लिहिले त्याने सर्वांची मनं तिने नक्कीच जिंकली आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना प्रीतीने लिहिले आहे की, ' A Powerhouse of talent ' हिटमॅनचा यंदाचा आयपीएल हंगाम एवढा चांगला गेला नाही. पण तरीही त्याच्याबद्दल प्रीतीने जे काही म्हटले आहे ते त्याच्या लौकिकाला साजेसे आहे, असे चाहत्यांना वाटले, त्यामुळेच प्रीतीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबईचे आता १२ सामन्यांमध्ये ८ गुण झाले आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघाचे अजूनही दोन सामने बाकी आहेत. हे दोन सामने मुंबईने जिंकले तर त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याला संघाला एकत्रित आणत पुढील सामन्यांत विजय मिळविणे महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये रोहित शर्माची भूमिकाही निर्णायक ठरू शकते, असे म्हटले जात आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-07T02:53:43Z dg43tfdfdgfd