'मायक्रोफोन अन् कॅमेरा बसवा...', DRS निर्णयावर मायकल वॉन यांना संशय, सुचवला 'हा' भन्नाट उपाय!

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड मधील मालिकेत डीआरएस वादावरून खूप वादविवाद झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी डीआरएसवर प्रश्नही उपस्थित केले होते. या वादावरून इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी डीआरएसवर आपलं मत व्यक्त केलं आहे आणि डीआरएसमधील तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी याबद्दलही त्यांनी काही सुचना मांडल्या आहेत.

टेलिग्राफ वृत्तपत्रात वॉन यांनी आपल्या कॉलममध्ये आपलं मत मांडलं आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार म्हणतात, "सोशल मीडियावर तुम्ही पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल की लोक आता डीआरएसवर विश्वास ठेवत नाहीत. काही चाहत्यांना टीमच्या बाजूने आणि विरुद्ध जाणाऱ्या निर्णयांवर राग येतो. यजमान प्रसारक आणि सहकारी कोण आहे? यावर संशय निर्माण होऊ लागला आहे. हे असं असूनही का? तंत्रज्ञान कंपन्या यजमान प्रसारक देशाच्या नसतात, उदाहरणार्थ, हॉक-आई ही यूकेची कंपनी आहे पण या मालिकेत त्याचा वापर होत आहे. यजमान प्रसारक त्यांना मालिकेसाठी घेऊन येतात, असं मायकल वॉन म्हणाला आहे.

मायकल वॉन यांनी सुचवला उपाय 

Michael Vaughan on DRS : मायकल वॉन यांच्या मते, डीआरएसमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी एक सोपा उपाय आहे. डीआरएस ट्रकमध्ये एक कॅमेरा आणि मायक्रोफोन बसवावा. यामुळे, निर्णय कसा घेतला जातो हे सर्वांना दिसून येईल. यामुळे, डीआरएसमधील विश्वास वाढेल.

ट्रकमध्ये (म्हणजेच रूममध्ये) एक कॅमेरा आणि मायक्रोफोन बसवल्यास, निर्णय घेताना काय घडतंय हे सर्वांना दिसून येईल. यामुळे, निर्णय घेण्यात किती लोक सहभागी आहेत हेही सर्वांना कळेल. जर आयसीसी (ICC) च्या अधिकाऱ्यालाही ट्रकमध्ये (रूममध्ये) तैनात केले गेले तर तेथे प्रामाणिकपणा दिसून येईल. तंत्रज्ञान चालवणाऱ्या दोन मैदानी अंपायरपेक्षा ट्रक (रूममध्ये) असणाऱ्या लोकांनाही तितकंच महत्त्व आहे, असा सल्ला मायकल वॉन यांनी दिलाय.

भारतविरूद्ध इंग्लंड यांच्यातील शेवटची टेस्ट मॅच धर्मशाळा येथे खेळली जाणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडची घोषणा केली आहे. 

पाचव्या सामन्यासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

2024-02-29T11:50:39Z dg43tfdfdgfd