मुंबई अजून एका पराभवानंतर आयपीएलच्या बाहेर होणार का, पाहा संपूर्ण समीकरण आहे तरी काय...

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा शनिवारी होणारा सामना हा दिल्ली कॅपिटल्सबरोबर आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानात होणार आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने पाच सामने गमावले आहेत. त्यामुळे जर मुंबई इंडियन्सने सहावा सामना गमावला तर त्यांचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते की नाही, याबाबतचे समीकरण आता समोर आले आहे.

आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाने ८ सामने खेळले आहेत. या आठ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला पाच पराभव पत्करावे लागले आहेत, तर त्यांना तीन विजय मिळवता आले आहेत. या तीन विजयांसह मुंबईच्या संघाचे आता सहा गुण झाले आहेत. या सहा गुणांसह मुंबईचा संघ हा आता आठव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये १० पैकी अव्वल ४ संघ पोहोचत असतात. त्यामुळे मुंबई इंडियन्सला अव्वल चार संघांत स्थान मिळवावे लागेल. अव्वल चार संघांमध्ये पोहोचण्यासाठी किमान १४ गुण होणे अनिर्वाय समजले जाते. पण आता मुंबई इंडियन्सचे फक्त सहा गुण मिळवले आहेत. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचायला त्यांना अजून ८ गुण कमवावे लागले. मुंबई इंडियन्सचे आता सहा सामने बाकी आहेत. या सहा सामन्यांत त्यांना हे आठ गुण मिळवावे लागणार आहेत. त्यासाठी मुंबईच्या संघाला सहा पैकी चार सामने किमान जिंकावे लागतील. पण जर त्यांना प्ले ऑफमधील स्थान भक्कम करायचे असेल तर त्यांना सहापैकी पाच सामने जिंकावे लागतील. त्यासाठी त्यांच्यासाठी दिल्लीच्या सामन्यातील विजय महत्वाचा असेल. कारण जर या सामन्यात विजय मिळवला तर त्यांना प्ले ऑफच्या दिशेने मार्गक्रमण करता येऊ शकते. पण मुंबईने दिल्लीचा सामना गमावला तरी त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचायची संधी असेल.

आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक एक खेळाडू आणि एक कर्णधार म्हणून अपयशी ठरलेला आहे. या गोष्टीचा फटकाही मुंबई इंडियन्सच्या संघाला बसलेला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ सध्याच्या घडीला प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणार का, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईचा कर्णधार बनलेल्या हार्दिक पंड्याची चिंता वाढलेली आहे. आता तर प्ले ऑफचे समीकरणही ठरताना दिसत आहे, त्यामुध्ये मुंबई इंडियन्सचा संघ कुठे आहे हे यावरून स्पष्ट होऊ शकते.

सध्याच्या घडीला गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे आणि त्यांचे १२ गुण झाले आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ किमान १६ ते १८ गुण कमावेल, असे चित्र दिसत आहे. मुंबईला जर प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना जवळपास सर्वच सामने जिंकावे लागतील, तरच ते १६ ते १८ गुणांसह पोहोचू शकतात, असे दिसत आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-26T13:12:39Z dg43tfdfdgfd