मुंबई इंडियन्स आयपीएलमधून आऊट, प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा ठरला पहिलाच संघ...

नवी दिल्ली : हैदराबादच्या संघाने फक्त ५८ चेंडूंत लखनौच्या १६५ धावांचे आव्हान लीलला पेलल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादच्या या विजयानंतर मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. कारण याबाबतचे एक समीकरण आता समोर आले आहे. त्यामुळे या आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांसाठी ही सर्वात वाईट गोष्ट असेल. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आता प्ले ऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

हैदराबादच्या संघाने या विजयासह दोन गुण मिळवले आणि त्यामुळे त्यांचे आता १४ गुण झाले आहेत. हैदराबादने फक्त दोन गुण कमावले नाहीत तर हा सामना त्यांनी १० विकेट्स आणि ६२ चेंडू राखत जिंकला. त्यामुळे हैदराबादचा रन रेटही आता चांगलाच वाढला आहे. त्यामुळे हैदराबादचा संघ हा १४ गुणांसह थेट तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहे आणि त्यांनी जवळपास प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यामुळे मुंबई इंडियन्सचे सर्व गणित बिघडले आहे.

लखनौच्या संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आता १२ गुणच राहीले आहेत. त्यामुळे त्यांचा संघ सहाव्या स्थानावर कायम आहे. पण आता लखनौचे अजून दोन सामने बाकी आहेत. यामध्ये लखनौ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण या दोन्ही संघांचे समान १२ गुण आहेत. या सामन्यात कोणताही संघ जिंकला तर त्यांचे १४ गुण होतील किंवा हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांचे १३ गुण होतील. दुसरीकडे मुंबईच्या संघाचे आता ८ गुण आहेत आणि त्यांचे फक्त दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे हे दोन्ही सामने जरी मुंबई इंडियन्सच्या संघाने जिंकले तरी त्यांचे १२ गुण होतात. मुंबईचा संघ १२ गुणांच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हैदराबादने लखनौवर विजय साकारल्यामुळे मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा प्ले ऑफच्या बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाचे आता दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या दोन सामन्यांत ते कशी कामगिरी करतात, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. कारण आता मुंबईच्या संघाला गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे आता मुंबईचा संघ हा खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांसाठी ही आता एक वाईट बातमी असेल. पण उर्वरीत दोन सामन्यांत ते संघाला कसा पाठिंबा देतात, हे पाहणे महत्वाचे असेल. त्याचबरोबर हार्दिकला चाहते स्विकारणार हा, हा सर्वात मोठा प्रश्न असेल. कारण आतापर्यंत त्याला चाहत्यांनी जोरदार ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले होते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-08T17:24:28Z dg43tfdfdgfd