मुंबईच्या पराभवाचा काय ठरला टर्निंग पॉइंट, कुठे नेमका सामना फिरला जाणून घ्या...

मुंबई : रोहित शर्माने एकाकी झुंज दिली खरी, पण मुंबई इंडियन्यसा विजय साकारता आला नाही. हा सामना मुंबईचा संघ जिंकेल, असे वाटत होते. पण मुंबईला हा सामना का जिंकता आला नाही, या सामन्याचा टर्निंग पॉइंट नेमका काय ठरला हे आता समोर आले आहे.

ऋतुराज गायकवाड आणि शिवन दुबे यांची जोडी चांगलीच जमली होती. या दोघांनी आपली अर्धशतके झळकावली आणि त्याचबरोबर ९० धावांची भागीदारीही रचली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. धोनी फक्त चार चेंडू खेळला, त्यामध्ये त्याने तीन षटकारांसह नाबाद २० धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे चेन्नईच्या संघाला मुंबई इंडियन्सपुढे २०७ धावांचे आव्हान ठेवता आले. त्यानंतर रोहित शर्माने मुंबईच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने यावेळी शतक झळकावले, पण तरीही मुंबईचा संघ जिंकू शकला नाही. पण एक काळ असा होता की, मुंबईचा संघ हा सामना जिंकू शकत होता. पण सामान मुंबईच्या हातून निसटल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईने २० धावांनी मुंबईच्या संघाला पराभूत केले. पण यावेळी मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट काय ठरला, हे समोर आले आहे.

सामना संपल्यावर चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू असलेल्या सुरेश रैनाने सांगितले की, " क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्वाची असते. मुंबई आणि चेन्नई यांच्यात चांगला सामना झाला. हा सामना जिंकण्याचा प्रयत्न मुंबईच्या संघाने केला, पण चेन्नईने या सामन्यात बाजी मारली. यावेळी दोन्ही संघांतील फरक एकच गोष्ट ठरली आणि ती गोष्ट महेंद्रसिंग धोनीच्या ४ चेंडूंतील नाबाद २० धावा. कारण फार कमी चेंडूंत चेन्नईला या २० धावा मिळाल्या. मुंबईला २० धावांनीच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे धोनीच्या या २० धावाच सामन्याच्या टर्निंग पॉइंट ठरल्या, असे मला वाटते. कारण या २० धावांनी सर्व समीकरणंच बदलून टाकले आणि त्यामुळेच हा सामना चेन्नईच्या बाजूने फिरला."

मुंबईला यावेळी २० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे धोनीने ज्या ४ चेंडूंत २० धावा केल्या, त्याच मुंबई इंडियन्सच्या संघाला भारी पडल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-14T19:25:37Z dg43tfdfdgfd