रोहितने हार्दिकला त्याची जागा दाखवली, सामना सुरु असताना नेमकं काय घडलं पाहा व्हिडिओ...

हैदराबाद : हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना अरेरावी करतो, असे आतापर्यंत पाहायला मिळाले होते. पहिल्या सामन्यात हार्दिकने रोहितला मैदानात चांगलेच पळवले होते, पण आता दुसऱ्या सामन्यात मात्र रोहित शर्माने हार्दिक पंड्याला त्याची जागा दाखवून दिल्याचे पाहाला मिळाले आहे. त्यानंतर रोहितचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सला दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या संघाची अब्रु यावेळी वेशीवर टांगली गेली, कारण मुंबई इंडियन्सच्या संघाची अशी धुलाई यापूर्वी कधीच झाली नव्हती. त्यावेळी सर्व चाहते हार्दिक पंड्याला ट्रोल केले. पण त्याचवेळी रोहित शर्माने हार्दिक पंड्याची मैदानात चांगलीच शाळा घेतल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.

ही गोष्ट घडली जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ हा गोलंदाजी करत होता. हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची पिसं काढली होती. त्यामुळे आता नेमकं काय करायचं, हे हार्दिक पंड्याला सुचत नव्हतं. त्यामुळे तो यावेळी रोहितकडे मदतीला गेला होता. हार्दिक यावेळी हतबल झाल्याचे पाहायला मिळाले होते. कारण त्याला नेमकं काय करावं, हे कळत नव्हतं. पण एक कर्णधार म्हणून असं राहता येत नाही. ही गोष्ट रोहित शर्माला समजली आणि त्याने संघाचे नेतृत्व करायला सुरुवात केली. हार्दिक त्यावेळी रोहित नेमकं काय करतो, हे पाहत होता. पण रोहितने यावेळी हार्दिकला बाऊंड्रीवर जाण्यास सांगितले. कारण हार्दिक जर जवळ असला असता तर तो पुन्हा हस्तक्षेप करायला लागला असता.

रोहितने जेव्हा हार्दिकला बाऊंड्रीवर जायला सांगितलं, तेव्हा हार्दिक मान झुकवून तिथून गपचुपपणे तो निघून गेला. चाहत्यांनी ही गोष्ट आपल्या कॅमेरांमध्ये कैद केली आणि आता हे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. रोहितच्या मनात हार्दिकचा बदला वैगैरे घ्यावा हि भावना नसावी, तर सामन्याचा एक भाग म्हणून रोहितने त्याला बाऊंड्रीवर जाण्यास सांगितले असल्याचे या व्हिडिओमध्ये तरी दिसत आहे. रोहित हा एक शांत आणि सभ्य कर्णधार आहे. त्यामुळे तो हार्दिकबरोबर फक्त रागापोटी ही गोष्ट केली नसल्याचे समोर येत आहे.

हार्दिकला हैदराबादच्या फलंदाजांना कसं थांबवायचं हे समजत नव्हतं. त्यामुळे तो रोहितकडे मदत मागायला गेला होता. रोहितने यावेळी मैदानात काही बदल केले. त्यामुळे हार्दिक हा संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता यापुढील सामन्यांत नेमंक काय होणार, संघाचे नेतृत्व कोण करणार असे प्रश्न चाहते विचारायला लागले आहेत.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T08:33:43Z dg43tfdfdgfd