हार्दिक पांड्या आऊट झाल्यावर मिम्सचा पाऊस, आता तुम्हीच पाहा

Hardik Pandya Memes: मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 मधील आपला तिसरा सामना खेळत आहे. हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली खेळण्यात येणारा हा सामना पहिल्या बॉलपासून चर्चेत आहे. टॉस उडवण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याची स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली. स्टेडियममध्ये रोहीत नावाचा गजर ऐकू येऊ लागला. दरम्यान कॉमेंट्री करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी प्रेक्षकांना सभ्यपणे वागण्याचे आवाहन केले. पण रोहित, रोहित हा आवाज इतका मोठा होता की ब्रॉडकास्टर्सना स्टेडियमचा आवाज कमी करावा लागला. 

रोहित शर्मा भोपळाही न फोडता तंबूत परतला. सुरुवातीचे 4 विकेट्स गेल्यानंतर सर्व आशा हार्दिक पांड्याकडून होत्या.

त्याने सुरुवातही दणक्यात केली. पण तो आऊट झाला.

हार्दिकच्या विकेटनंतर सोशल मीडियात मिम्सचा पाऊस पडू लागला आहे.

मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाल. सलामीवीर रोहित शर्मा केवळ 1 धाव करून बाद झाला. तर नमन धीर देखील पुढच्याच बॉलवर एलबीडब्ल्यू झाल्याने पहिल्या ओव्हरमध्ये मुंबईला दोन गडी गमवावे लागले

ट्रेंड बोल्डने आक्रमक सुरूवात करून दिली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आलेला डेवाल्ड ब्रेव्हिस शुन्यावर बाद झाला. मुंबईची पहिले तिन्ही खेळाडू पहिल्याच बॉलवर बाद झालेत. मुंबई इंडियन्सला चौथा धक्का बसला. सलामीवीर इशान किशन 16 धावा करून बाद झाला. नांद्रे बर्गरने इशानला तंबूत पाठवून पलटणला बॅकफूटवर पाठवलं. खराब सुरूवात झाल्यानंतर मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्याने 21 बॉलमध्ये 34 धावांची खेळी केली. युझी चहलने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं.

मुंबई इंडियन्सने 10 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या आहेत. मुंबईचा अँकर बॅट्समन म्हणून मैदानात आलेला पियूष चावला 3 धावा करून बाद झाला. आवेश खानने त्याला तंबूत पाठवलं. त्यामुळे मुंबईला 6 वा धक्का बसला.

काय आहे प्रकरण?

रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत बहारदार कामगिरी केली होती. दरम्यान रोहितला डावलून यावेळी गुजरात टायटनमधून मुंबईच्या टीममध्ये घरवापसी केलेल्या हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी देण्यात आली. टिम मॅनेजमेंटने घेतलेला निर्णय क्रिकेट चाहत्यांना अजिबात आवडलेला दिसत नाही. त्यांनी मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या मॅचपासूनच रोहित शर्मा कॅप्टन असल्याच्या घोषणा दिल्या आहेत. आजच्या मॅचमध्येदेखील प्रेक्षकांनी रोहित शर्माला सपोर्ट करणारे पोस्टर्स आणले होते. पण सुरक्षा रक्षकांनी ते बाहेरच काढून घेतले. असे असले तरी प्रेक्षकांचा आवाज शांत करता आला नाही. 

2024-04-01T15:22:05Z dg43tfdfdgfd