हार्दिक पंड्या अ‍ॅक्टिंग करतोय; मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर माजी कर्णधाराने सर्वांसमोर केली पोलखोल

मुंबई: हा तो हार्दिक पंड्या नाही जो दोन हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाला सोडून गेला होता. हा तो व्यक्ती नाही ज्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला सलग दोन वेळा फायनलमध्ये पोहोचवले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक एक सामान्य खेळाडू झाला आहे. त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीचे कौशल्य फार कमी पाहायला मिळाले. ही वाक्य अन्य कोणाची नसून भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांची आहेत. रविवारी चेन्नई सुपर किंग्जकडून झालेल्या पराभवानंतर गावस्करांनी हार्दिकच्या सर्व चूका सांगण्यास सुरूवात केली आणि त्याच इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन देखील सहभागी झाला.

पीटरसन म्हणाला, हार्दिकने मॅचमध्ये आधीच फिरकीपटूंकडून गोलंदाजी करवून घ्यायला हवी होती. कारण जलद गोलंदाज फार धावा देत होते. मी आज जे काही पाहिले ते पुरेसे नव्हते. मी एक असा कर्णधार पाहिला ज्याच्याकडे मॅचच्या ५ तास आधी एका टीम मिटिंगमधून ए प्लॉन होता आणि कर्णधाराला प्लॉन बी कडे जायचे नव्हते. जेव्हा तुमचे जलद गोलंदाज २० धावा देत होते, तेव्हा फिरकीपटूंकडून गोलंदाजी का करून घेतली नाही.

चेन्नईचे ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे जेव्हा गोलंदाजांची धुलाई करत होते. तेव्हा ब्रायन लारा समालोचन करत होते. ते म्हणाले, कृपया आपण फिरकीपटूंकडून गोलंदाजी करवून घेऊ शकतो? त्यांच्याकडे फिरकीपटू आहेत जे गोलंदाजी करू शकतात. तुम्हाला रणनिती बदलण्याची गरज आहे.

या लढतीत धोनीने हार्दिक पंड्याने टाकलेल्या अखेरच्या षटकात २० धावा केल्या आणि मुंबईने ही लढत २० धावांनी गमावली. यावर बोलताना पीटरसन म्हणाला, धोनी सराव सत्रात अखेरच्या षटकात कशी फलंदाजी करायची याचा सराव करताना दिसतो. पण हार्दिकने कधी डेथ ओव्हरमध्ये फलंदाजीचा सराव केला आहे का? तो डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकतो का?

मैदानाच्या बाहेरच्या गोष्टींचा देखील परिणाम होत आहे. रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार केल्याचा राग चाहत्यांच्या मनात आहे. त्याचा परिणाम हार्दिकवर होत आहे. ही गोष्ट लवकरात लवकर मिटवली पाहिजे, कारण हार्दिकचा त्यावर परिणाम होताना दिसतोय.

मला वाटते की हार्दिकवर खेळाड्या बाहेरच्या गोष्टींचा परिणाम होतोय. टॉसच्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर अधिक हस्य दिसत होते. तो हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता की, तो खुप खुष आहे. पण प्रत्यक्षात तो खुश नाही. मी त्या ठिकाणी राहिलो आहे. मी सांगू शकोत की या गोष्टी तुम्हाला किती प्रभावित करतात. हार्दिक पंड्यासोबत काय सुरू आहे... आम्हाला आवाज ऐकू येतोय आणि धोनी त्याला षटकार मारताना संपूर्ण मैदान किती आनंदी आहे. त्याच्या सोबत अशा प्रकारचा व्यवहार होऊ नये. यामुळे त्याचे क्रिकेट बिघडत आहे. काही तरी केले पाहिजे, असे पीटरसन म्हणाला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-15T10:36:24Z dg43tfdfdgfd