हार्दिक पंड्या काय चंद्रावरून आलाय का... भारताच्या खेळाडूने बीसीसीआयला फटकारले

नवी दिल्ली : मैदानात नसतानाही हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने एकही सामना न खेळता त्याला आपल्या काररात सामील केलं. त्यामुळे हार्दिक पंड्या हा काय चंद्रावरून आला आहे का, असा सवाल विचारत भारताच्या खेळाडूने बीसीसीआयलाच फटकारले आहे.

हार्दिक पंड्याला वनडे वर्ल्ड कप खेळताना मैदानातच दुखापत झाली होती. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला तिथून थेट हॉस्पिटलमध्येच नेण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत हार्दिक हा मैदानात उतरलेला नाही. पण मैदानात न उतरता त्याचे सारे काही आलबेल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधार करण्यात आले तेव्हा तो मैदानात नव्हता. त्यावेळी हार्दिक दुखापतीवर उपचार घेत होता. त्यानंतर बीसीसीआयने आपले करार जाहीर केले, त्यामध्ये इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वगळण्यात आले असले तरी हार्दिकचे नाव मात्र कायम होते.

या सर्व गोष्टींबाबत भारताचा माजी खेळाडू प्रवीण कुमार म्हणाला की, " हार्दिक पंड्या काय चंद्रवरून आला आहे का. त्याला पण स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावं लागेल. बीसीसीआयने हार्दिकलाही इशान आणि श्रेयस यांच्यासारखं सांगायला हवं. कारण सर्वांना सारखेच नियम असायला हवेत, असे ला वाटते. हार्दिक पंड्या काय ६-७० कसोटी सामने खेळलाय का की आता फक्त तो टी-२० सामने खेळेल. जर देशाला, संघाला गरज असेल तर त्याने मैदानात उतरायला हवं. जर तुला कसोटी क्रिकेट खेळायचे नसेल तर तसे लिहून द्यायला हवे. कदाचित त्याला कसोटी संघात घेणार नाही, असे सांगण्यात आले आहे."

एकिकडे स्थानिक क्रिकेट न खेळल्यामुळे इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयने करारत स्थान दिले नाही. दुसरीकडे हार्दिकही बीसीसीआयच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळला नाही, पण तरीही त्याला बीसीसीआयच्या करारात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे इशान आणि श्रेयसला एक न्याय व हार्दिक पंड्याला वेगळा का, असा सवाल आता बीसीसीआयला प्रवीण कुमारनेही विचारला आहे. पण बीसीसीआय या प्रश्नाचे उत्तर देणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.

2024-03-15T09:32:29Z dg43tfdfdgfd