हार्दिक पंड्याकडून टॉस जिंकल्यावर झाली मोठी चूक, रवी शास्त्रींना काय म्हणाला जाणून घ्या...

मुंबई : मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याचा टॉसच्यावेळी चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हार्दिककडून यावेळी एक मोठी चूक झाली. त्यावेळी रवी शास्त्री यांनी त्याची चूक दाखवून दिली. त्यानंतर हार्दिकने आपली चूक सुधारल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने मुंबईचा ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला. यावेळी मुंबईच्या संघात कोणता बदल करण्यात आला नाही, तर चेन्नईच्या संघाने एकच बदल केला. पण टॉसच्यावेळी हार्दिककडून एक मोठी चूक घडल्याचे समोर आले.

हार्दिकने टॉस जिंकला आणि त्यानंतर समालोचक रवी शास्त्री हे त्याच्यावर संवाद साधत होता. हा संवाद संपत असताना शास्त्री यांनी हार्दिकला विचारले की, ' तु टॉस जिंकला आहे, टॉस जिंकून तू काय स्विकारले आहेस?' त्यावर हार्दिक म्हणाला की, ' टॉस जिंकून यावेळी मी फलंदाजी स्विकारली आहे.' जेव्हा टॉस झाला होता, तेव्हा हार्दिकने आपण प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हार्दिकच्या या वक्तव्याने सर्वच टेंशनमध्ये आले, त्यावेळी रवी शास्त्री यांनी हार्दिकची चूक सुधारली. त्यानंतर हार्दिकने आपण टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले.

मुंबईसाठी हा सामना महत्वाचा असेल. कारम सलग दोन सामने त्यांनी जिंकले आहेत. त्यामुळे हा सामान जिंकून त्यांना विजयाची हॅट्रीक साधता येऊ शकते. त्यामुळे मुंबईचा संघ हा सामना जिंकतो का, हे सर्वात महत्वाचे असेल. मुंबईने दोन विजयांसह आता चार गुण पटकावले आहेत. त्यामुळे ते गुतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. पण जर हा सामना त्यांनी जिंकला तर त्यांचे सगा गुण होतील आणि त्यांना गुणतालिकेत मोठी झेप घेता येऊ शकते.

चेन्नईच्या संघाने आयपीएलची सुरुवात विजयाने केली होती. पण दोन विजयांनंतर त्यांचे दोन पराभवही झाले. पण आता ते विजयाच्या मार्गावर परतले आहेत. त्यामुळे तीन विजयांसह त्यांच्या खात्यात आता सहा गुण आहे. चेन्नईचा संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पण हा सामना चेन्नईच्या संघाने जिंकला तर त्यांना दुुसऱ्या स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. त्यामुळे हा सामना मुंबईचा संघ जिंकतो की चेन्नईचा, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

मुंबई वि. चेन्नई

ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई

प्रक्षेपण ः संध्याकाळी ७.३० पासून स्टार स्पोर्ट्स, जिओ सिनेमा

दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी : मुंबईचा पाचपैकी दोन सामन्यांत विजय आणि तीन पराभव. गुणतक्त्यात सातवे. निव्वळ धावगती -०.०७३. चेन्नईचे पाचपैकी तीन सामन्यांत विजय आणि दोन पराभव. गुणतक्त्यात तिसरे. निव्वळ धावगती ०.६६६

गेल्या पाच सामन्यांत ः मुंबईचे तीन पराभव आणि दोन विजय, तर चेन्नईचे तीन विजय आणि दोन पराभव

एकमेकांविरुद्ध ः प्रतिस्पर्ध्यांतील ३६ लढतींत मुंबईचे २०-१६ असे वर्चस्व; मात्र गेल्या पाचपैकी चार सामन्यांत चेन्नई विजयी

हवामानाचा अंदाज ः सामन्याच्या वेळी तापमान ३० अंशाच्या आसपास. काहीसे ढगाळ हवामान लढतीच्या सुरुवातीस अपेक्षित. आर्द्रता ७६ टक्के.

खेळपट्टीचा अंदाज ः फलंदाजांस अनुकूल खेळपट्टी. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा १२पैकी सात सामन्यांत विजय. डावाच्या सुरुवातीस वेगवान गोलंदाजांना चांगली साथ अपेक्षित.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-14T13:55:26Z dg43tfdfdgfd