Ravindra Jadeja, CSK vs RR : चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नईने राजस्थानच्या संघाचा (CSK vs RR) धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 141 धावा केल्या. त्याता प्रत्युत्तर देताना चेन्नईने 18.2 षटकांत 5 गडी गमावून 145 धावा केल्या आणि सामना खिशात घातला. सामना चेन्नईने जिंकला खरा पण चर्चा झाली ती जडेजाच्या विकेटची.. नेमकं काय झालं? रविंद्र जडेजाने खरंच चिटींग (Ravindra Jadeja obstructing the field) केली का? असा सवाल विचारला जातोय.
नेमकं काय झालं?
राजस्थानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने संथ फलंदाजी करून सुरूवात केली आणि चेन्नईने चार विकेट गमावून 121 धावा केल्या होत्या. त्यामुळे सामना दोन्ही बाजूने झुकण्याची शक्यता होती. त्याचवेळी आवेश खान 16 व्या षटकात गोलंदाजी करायला आला. जडेजा आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत होते. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर जड्डूने शॉट थर्ड मॅनच्या दिशेने मारला आणि जोरात धाव घेतली. दोन धावा पूर्ण होतील, असं जड्डूला वाटत होतं.
जड्डूने पहिली धाव जोरात घेतली अन् दुसरी धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात ऋतुराजने दुसरी धाव न घेण्याचा कॉल दिला. जड्डूची तारंबळ उडाली. तो पुन्हा मागे फिरला अन् नॉन स्ट्राईक इन्डकडे धावला. मात्र, जड्डू स्टंप अडवून धावला अन् त्याचवेळी विकेटकिपर संजूने नॉन स्ट्राईक इन्डच्या दिशेने थ्रो केला. बॉल जडेजाच्या पाठीला लागला. त्यावेळ राजस्थानच्या खेळाडूंनी आऊटसाठी अपिल केलं अन् अंपायरने मैदानात अडथळा आणल्याबद्दल जडेजाला बाद घोषित केलं. त्यावरून जडेजा चांगलाच नाराज असल्याचं दिसत होतं.
आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असं घडलं
जडेजापूर्वी 2013 मध्ये युसूफ पठाण आणि 2019 मध्ये अमित मिश्रा अशाप्रकारे बाद झाले होते. 2013 मध्ये पहिल्यांदा केकेआरचा युसूफ पठाण रांचीमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने बाद झाला होता. तर अमित मिश्रा विशाखापट्टणममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून बाद झाला होता. यंदाच्या हंमागात हैदराबादविरुद्ध खेळताना देखील जडेजा बद होताहोता वाचला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध हेनरिक क्लासेनचा थ्रो त्याच्या अंगावर आदळला होता. मात्र, हैदराबादने अपिल केली नव्हती, त्यामुळे जडेजाला बाद घोषित केलं नव्हतं.
2024-05-12T15:17:57Z dg43tfdfdgfd