रोहित आणि हार्दिकसमोर नीता अंबानी यांनी मौन सोडले, व्हिडिओमध्ये सांगितली महत्वाची गोष्ट

मुंबई : हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये या हंगामात विस्तवही जात नव्हता, हे पाहायला मिळाले. हार्दिकने कर्णधार झाल्यावर बरेच बदल संघात केले आणि त्याचा फटका संघाला बसला. पण आता रोहित आणि हार्दिक यांच्यासमोर मुंबई इंडियन्सच्या संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी आपले मौन सोडले आहे. नीती अंबानी यांची हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हार्दिकच्या नेतृत्वखाली मुंबई इंडियन्सची वाईट कामगिरी झाली. आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणार मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर नामुष्की ओढवली होती. या गोष्टीवर आतापर्यंत नीता अंबानी यांनी आपलं मत जाहीर केले नव्हते. पण नीता अंबानी यांनी मात्र रोहित आण हार्दिकसमोर अखेर आपले मौन सोडले आहे. नीता अंबानी यांनी यावेळी संघाच्या कामगिरीबरोबर अन्य काही गोष्टींवर आपले मत व्यक्त केले. त्यामुळे अंबानी यांचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

नीता अंबानी म्हणाल्या की, " आपल्या सर्वांसाठी निराशाजनक असा हा हंगाम होता. आपल्याला पाहिजे तशा गोष्टी घडल्या नाहीत, पण तरीही मी मुंबई इंडियन्सची मोठी चाहती आहे, फक्त मालक नाही. मला वाटते की मुंबई इंडियन्सची जर्सी घालणे हा एक मोठा सन्मान आहे. मुंबई इंडियन्सशी जोडले जाणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. असे मला वाटते. माझ्यामते आपलं कुठे चुकलं, याचा विचार करायला हवा. त्यासाठी पुनरावलोकन करू." नीता अंबानी बोलत असताना यावेळी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यासमवेत संपूर्ण मुंबई इंडियन्सचा संघ उपस्थित होता. मुंबई इंडियन्सच्या संघाबाबत त्यांनी महत्वाचे विधान केले आहे. मुंबई इंडियन्सची मी फक्त मालक नाही तर चाहती आहे, असे त्यांनी सांगितलेच. पण मुंबई इंडियन्सची जर्सी घालणे हा मोठा सन्मान असल्याचे, महत्वाचे वाक्य त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या विधानामुळेच नक्कीच संघातील खेळाडूंना बळ मिळू शकते.

नीता अंबानी यांनी T20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. नीता अंबानी म्हणाल्या की, "रोहित, हार्दिक, सूर्या आणि बुमराह यांना सर्व भारतीय वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा देत आहेत. या वर्ल्ड कपसाठी तुम्हाला आमच्या सर्वांकडूनही शुभेच्छा."

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-21T12:30:33Z dg43tfdfdgfd