147 वर्षांचं झालं कसोटी क्रिकेट, त्यावेळी होता 'हा' खास नियम... पाहा कोण जिंकलं होतं?

First Test Match ever played : क्रिकेटच्या इतिहासात 15 मार्च हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. 147 वर्षांपूर्वी म्हणजे 1877 साली याच दिवशी कसोटी क्रिकेटला (Test Cricket) सुरुवात झाली होती. क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (England vs Australia) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळवण्यात आला होता. विशेष म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यात वेळेची कोणतीही मर्यादा नव्हती. दोन्ही संघांना प्रत्येक इनिंग खेळायच्या होत्या. यासाठी कितीही दिवस ते खेळू शकत होते. कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना 15 ते 19 मार्चदरम्यान रंगणला होता. या सामन्यात तिन दिवसांच्या खेळानंतर चौथ्या दिवशी म्हणजे 18 मार्च 1877 ला विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला होता. सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. 

पहिलं शतक बॅनरमॅनच्या बॅटमधून

पहिल्या ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज चार्ल्स बॅनरमॅन (Charles Bannerman) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावलं. इतकंच नाही तर पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिली धावही बॅनरमॅनच केली. तर इंग्लंडच्या अल्फ्रेड शॉ नावाच्या गोलंदाजाला पहिल्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिला चेंडू टाकण्याचा मान मिळाला होता.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या शतकाची नोंद चार्ल्स बॅनरमॅन यांच्या नावावर जमा झालं आहे. बॅनरमॅन 165 वैयक्तिक धावांवर रिटायर्ड झाले. त्यांच्या बोटाला दुखात झाली, त्यामुळे त्यांनी मैदान सोडलं.

कंगारू बल्लेबाज चार्ल्स बैनरमैन ने इसके बाद पचास के व्यक्तिगत स्कोर को छुआ. इतना ही नहीं, उन्होंने उस अर्धशतक को शतक में तब्दील कर इतिहास रच दिया. इंटरनेशनल क्रिकेट में जब भी पहले शतक की बात की जाएगी, तो बैनरमैन का नाम सबसे ऊपर होगा. आखिरकार बैनरमैन 165 रन बनाकर रिटायर्ड हर्ट हुए थे. दरअसल, बैनरमैन चोटिल हो हो गए थे. उनकी उंगली में चोट लगी थी. 

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 245 धावा केल्या. यात एकट्या चार्ल्स बॅनरमॅन यांच्या 165 धावांचा समावेश होता. याला उत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात 196 धावा केल्या. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज हॅरी जुप्पने सर्वाधिक 63 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून बिली मिडविंटरने पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 49 धावांची आघाडी मिळाली होती.

दुसऱ्या डावात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला अवघ्या 104 धावात गारद केलं. ऑस्ट्रेलियाचा सात फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. इंग्लंडच्या अल्फ्रेड शॉने पाच तर जॉज उलिएटने तीन विकेट घेतल्या. इंग्लंडसमोर विजयासाठी 154 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ केवळ 108 धावा करु शकला. इंग्लंडच्या केवळ तीन फलंदाजांना दोन अंकी धावा केल्या. विकेटकिपर जॉन सेल्बीने सर्वाधिक 38 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या टॉम कँडलने सर्वाधिक 7 तर जॉन होजेसने दोन विकेट घेतल्या.

आतापर्यंत किती कसोटी सामने?

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 2535 सामने खेळवण्यात आले आहेत. यात सर्वाधिक कसोटी सामन इंग्लंड संघाने खेळले आहेत. इंग्लंड क्रिकेट संघ आतापर्यंत l071 कसोटी सामने खेळला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांच्या नावावर आतापर्यंत 866 कसोटी सामन्यांची नोंद आहे. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 414 तर इंग्लंड 392 कसोटी सामने जिंकले आहेत. सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या संघाच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत 579 कसोटी सामने खेळण्याचा मान मिळवलाय. यात 178 सामने जिंकलेत. तर तितक्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे तब्बल 222 सामने ड्रॉ झालेत. 

2024-03-15T09:30:46Z dg43tfdfdgfd