AJINKYA RAHANE: संघातून बाहेर होतो तेव्हा... रोहित-द्रविडवर रहाणेचं मोठं वक्तव्य, पाहा काय बोलून गेला

मुंबई: लंडनला पोहोचलेल्या टीम इंडियाच्या सर्वात सीनियर खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2023) च्या अंतिम सामन्यात आपली जादू दाखवताना दिसेल. अलीकडे त्याला बराच काळ संघाबाहेर राहावे लागले होते. तब्बल १८ महिन्यांनंतर आता त्याची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. मात्र, या सामन्यापूर्वी रहाणेने मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघ सध्या लंडनमध्ये आहे, जिथे ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांचे खेळाडू लंडनला पोहोचले असून सरावात व्यस्त आहेत. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे आहे.

टीममधून बाहेर असताना कुटुंबाचा मोठा आधार

दरम्यान, अजिंक्य रहाणेने महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो संघाबाहेर होता तेव्हा त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. रहाणेने त्याचे कुटुंब आणि मित्रांचे आभार व्यक्त केले आहेत, ज्यांनी तो टीम इंडियातून बाहेर असतानाही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. तो म्हणाला, 'हे माझ्यासाठी भावनिक होते. जेव्हा मी संघाबाहेर होतो तेव्हा मला माझ्या कुटुंबाचा मोठा आधार होता, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. भारतासाठी खेळणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मी माझ्या फिटनेसकडे खूप लक्ष दिले. मी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मी पुन्हा भारतासाठी खेळू शकेन असा मला विश्वास होता.

राहुल आणि द्रविडचे कौतुक

रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. त्याने आतापर्यंत ८२ कसोटी सामन्यांमध्ये ४९३१ धावा केल्या आहेत. त्याने सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. रहाणे म्हणाला, 'रोहित संघाला चांगल्या प्रकारे सांभाळतो आहे आणि राहुल द्रविड देखील संघाला खूप चांगल्या प्रकारे पुढे नेत आहे. याने संघाला मदत मिळते आणि संघातील वातावरण खूप छान आहे. प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या सहवासाचा पूर्ण आनंद घेत आहे.

2023-06-03T15:52:40Z dg43tfdfdgfd