CRICKETER CAR ACCIDENT: लग्झरी कारचा भयानक अपघात; दिग्गज क्रिकेटपटू रुग्णालयात, प्रकृती गंभीर

अनुराधापूर (श्रीलंका): श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमाने याचा अनुराधापूर शहराजवळ गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तो जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याची गाडीने समोरून आलेल्या एका मिनी ट्रकला धडकली. लाहिरुला अनुराधापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात लाहिरुची दुखापत किती गंभीर आहे याची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अपघातावेळी गाडीत त्याच्या सोबत असलेल्या अन्य तिघांना दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सकाळी ७ वाजून ४५ मिनिटाला झाला.

लाहिरु थिरिमाने त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एका धार्मिक स्थळाकडे जात असताना हा अपघात झाला. श्रीलंकेकडून २०१० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लाहिरुने देशाकडून ४४ कसोटी, १२७ वनडे आणि २६ टी-२० मॅच खेळल्या आहेत. कसोटीत त्याचने २ हजार ८८, वनडेत ३ हजार १९४, टी-२० मध्ये २ हजार १४ धावा केल्या आहेत. श्रीलंकेने २०१४ साली टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले होते तेव्हा लाहिरू विजेत्या संघाचा सदस्य होता. त्याने ३ टी-२० वर्ल्डकप आणि दोन वनडे वर्ल्डकप खेळले आहेत.

लाहिरूने पाच वनडेत श्रीलंकेचे नेतृत्व देखील केले होते. त्याने मार्च २०२२ साली श्रीलंकेकडून अखेरची मॅच खेळली होती. जुलै २०२३ मध्ये १३ वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्याने निवृत्ती घेतली होती.

वर्षभरापूर्वी भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याचा असाच अपघात झाला होता. या अपघातानंतर १४ महिने झाले त्याला मैदानात उतरता आले नव्हते. आता २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १७व्या हंगामात पंत खेळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवासांपासून पंत मैदानात सराव करताना दिसतोय. बीसीसीआयने देखील पंत आयपीएल खेळणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयपीएलनंतर वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याला संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

2024-03-14T09:59:50Z dg43tfdfdgfd