CSK VS GT सामन्यात जडेजासाठी चाहते उभ राहून देणार मानवंदना, ७.३८ ही वेळ का आहे खास...

चेन्नई : रवींद्र जडेजासाठी गुजरात टायटन्सविरुद्धचा मंगळवारचा सामना खास असणार आहे. कारण या सामन्यात चाहते ७.३८ मिनिटांनी उभं राहून जडेजाला खास मानवंदना देणार आहेत. जडेजासाठी ही वेळही खास ठरणार आहे.

रवींद्र जडेजा हा २०१२ या वर्षापासून चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आहे. त्यावेळी चेन्नईच्या संघाने जडेजाला तब्बल ९.८ कोटी रुपये खर्च करून आपल्या ताफ्यात दाखल केले होते. चेन्नईसाठई तो सर्वांत महागडा खेळाडू ठरला होता. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी जडेजा हा गुजरात लायन्स या संघाकडून खेळला होता. जेव्हा चेन्नईवरील बंदी उठवण्यात आली तेव्हा तो पुन्हा संघात दाखल झाला होता. २०२२ साली जडेजाला चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. पण चेन्नईचे यशस्वी नेतृत्व करण्यात तो अपयशी ठरला आणि धोनीकडे पुन्हा संघाचे नेतृत्व आले होते. गेल्यावर्षी जडेजाने अंतिम फेरीच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत संघाला जेतेपद जिंकवून दिले होते.

ही आयपीएल स्पर्धा जडेजासाठी खास आहे. आजच्या गुजरातच्या सामन्यात तर त्याला चाहते खास मानवंदना देणार आहेत. कारण जडेजा हा चेन्नईच्या संघाकडून खेळताना ८ व्या क्रमांकाची जर्सी वापरतो. त्यामुळे जडेजाला खास मानवंदना देण्यासाठी आज ७.३८ ही खास वेळ निवडण्यात आली आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात होणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी चेन्नईचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील. त्यामुळे जडेजासाठी हा खास क्षण असल्याचे म्हटले जात आहे. जडेजा हा चेन्नईचा एक महत्वाचा खेळाडू आहे, ज्याला त्यांनी यापूर्वी कर्णधारही केले होते. पण संघाचे कर्णधारपद भूषवताना त्याची स्वत: ची कामगिरीही ढासळली होती. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढण्यात आले होते. पण संघाने त्यावर कायम विश्वास ठेवला आहे. कारण त्यांच्यासाठी तो एक महत्वाचा खेळाडू आहे.

जडेजाने एक खेळाडू म्हणून चेन्नईसाठी भन्नाट कामगिरी केली आहे. त्यामुळे आता या आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

2024-03-26T12:14:26Z dg43tfdfdgfd