GT VS PBKS PITCH REPORT: आज गुजरात विरुद्ध पंजाब आमनेसामने, सामन्यात खेळपट्टी कोणाल साथ देणार?

IPL 2024 GT vs PBKS Pitch Report: आयपीएल  2024 स्पर्धेत आज 17 वा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्जसोबत होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता अहमदाबादच्या स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार? तसेच हवामानाचा अंदाज कसा असेल ते जाणून घेऊयात. 

अहमदाबादची अशी असेल खेळपट्टी

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियमचा पिचवर गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही समान मदत मिळणार आहे. येथे फलंदाज मैदानावर टिकून राहिल्यास बॅट्समन मोठी खेळी खेळू शकतात. 

शक्यतो या मैदानावर फलंदाजांना खेळी शक्य होते. मात्र गेल्या सामन्यात खेळपट्टी थोडी संथ होती. त्यामुळे फलंदाजांना शॉट्स मारण्यात अडचणी आल्या. तसेच आयपीएलच्या 2024 या मोसमात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये एकाही संघाला 170 चा आकडा गाठता आला नाही. परिणामी आजचा सामना कोण वर्चस्व गाजवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आजच्या सामन्यासाठी हवामान अंदाज 

आज संध्याकाळपर्यंत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहेय. तसेच तापमान 40 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणारा GT विरुद्ध PBKS सामन्याचा वेळी  तापमान सुमारे 30 अंशांपर्यंत खाली येईल. हवामान ढगाळ आणि उबदार आहे. 80 टक्के ढगांनी आकाश व्यापलेले असेल पण पावसाची शक्यता नाही. 

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

गुजरात टायटन्स संभाव्य प्लेईंग 11 : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, दर्शन नळकांडे, नूर अहमद

पंजाब किंग्ज संभाव्य प्लेईंग 11 :  शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर 

2024-04-04T08:12:54Z dg43tfdfdgfd