HARDIK PANDYA: मी 'त्या' गोष्टींकडे लक्ष देत नाही...; रोहितकडून कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा बोलला हार्दिक

Hardik Pandya: आयपीएल 2024 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 22 तारखेपासून आयपीएलला सुरुवात होणार असून सर्व टीम्सच्या खेळाडूंनी प्रॅक्सिटला सुरुवात केली आहे. अशातच आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये जॉईन झाला आहे. दरम्यान सोमवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि कोच मार्क बाऊचर यांची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी हार्दिकला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला. 

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार मुंबई इंडियन्स

आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत करार केला. यावेळी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. इतकंच नाही तर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवलं. फ्रँचायझीचं हे पाऊल चाहत्यांना अजिबात आवडलं नाही. हार्दिक पांड्याने सांगितले की, रोहित शर्मासोबत आगामी सिझनबाबत सविस्तर चर्चा केलेली नाही. यावेळी तो रोहित शर्माशी बोलणार असल्याचं त्याने म्हटलंय.

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

हार्दिक म्हणाला की, यंदाच्या सिझनमध्ये काहीही वेगळे होणार नाही. मला गरज पडल्यास रोहित शर्मा मला मदत करेल. तो टीम इंडियाचा कर्णधार आहे. तो मला मदत करेल कारण या टीमने त्याच्या नेतृत्वाखाली जे काही साध्य केलंय ते मला पुढे न्यायचं आहे. यावेळी काही विचित्र किंवा वेगळं होणार नाहीये. मी रोहितच्या नेतृत्वाखाली पूर्ण करियर खेळलोय. त्यामुळे संपूर्ण सिझन त्याचा हात माझ्या खांद्यावर असेल अशी मला आला आशा आहे. 

चाहत्यांवरून काय म्हणाला हार्दिक पंड्या?

हार्दिक पंड्याला कर्णधार केल्याचा हा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही. याविषयी बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, मी कर्णधार झाल्याने चाहते संतापलेत. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही आमच्या चाहत्यांचा आदर करतो. यावेळी आमचं लक्ष खेळावर असणार आहे आहे. माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर मी नियंत्रण ठेवेन. ज्या गोष्टी मी नियंत्रित करू शकत नाही त्याकडे मी लक्ष देत नाही. मी चाहत्यांचा ऋणी असून त्यांना हवे ते बोलण्याचा अधिकार आहे. मी त्याच्या विचारांचा आदर करतो. आम्ही अधिक चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करतोय

रोहितविषयी उत्तर देणं टाळलं?

सोमवारी मुंबई इंडियन्सच्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या आणि टीमचे प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर सहभागी झाले होते. मात्र यावेळेस दोघांनीही कर्णधारपदाचा निर्णय असा तडकाफडकी का घेण्यात आला या प्रश्नाचं उत्तर टाळलं. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडीओमध्ये या दोघांनी जाणीवपूर्वकपणे या प्रश्नाचं उत्तर टाळल्याचं दिसून आलं. या दोघांनीही रोहित शर्माविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देणं टाळल्याने पुन्हा विविध चर्चा रंगू लागल्यात.

2024-03-19T11:36:19Z dg43tfdfdgfd