ICC टी20 क्रमवारीत राशिद खानला बंपर फायदा, सूर्यकुमार यादवची बादशाहत कायम...

ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने टी20 क्रिकेटची ताजी क्रमवारी (ICC T20 Ranking0 जाहीर केली आहे. यात दुखापतीतून मैदानावर उतरलेल्या अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने (Rashid Khan) जोरदार कमबॅक केलं आहे. गोलंदाजी क्रमवारीत राशिद खानने चार स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसी टी20 गोलंदाजी क्रमवारीत राशिद खान आता नवव्या क्रमांकावर पोहोचलाय. राशिदने आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 3 सामन्यात 8 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. या कामगिरीमुळे तो पुन्हा टॉप-10 मध्ये पोहोचला आहे. 

सूर्यकुमार यादवची बादशाहात कायम

आयसीसी टी20 फलंदाजीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज मिसटर 360 सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) बाशाहत कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा फिल सॉल्ट आहे. फलंदाजीत टॉप-10मध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. टॉप-10 मध्ये सूर्यकुमार यादवशिवाय भारताच्या यशस्वी जयस्वालचाही समावेश आहे. जयस्वाल सहाव्या क्रमांकावर आहे. यावेळच्या क्रमवारीचं वैशिष्ट्य म्हणजे आयर्लंडच्या खेळाडूंनीही क्रमावारीत जागा पटकावली आहे. आयर्लंडचा जोशुआ लिटिल 39 तर मार्क एडर 56 व्या क्रमांकावर आहे. बॅरी मॅक्कार्थी 15 स्थानांची झेप घेत 77 व्या स्थानावर पोहोचलाय. 

राशिद खानचं जोरदार कमबॅक

दुखापतीतून सावरलेल्या राशिद खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. आयर्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत राशिद खानने 8 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडचा मिचेल सँटनरनेही एका स्थानाची मजल मारत आठवा क्रमांका गाठला आहे. टी20 गोलंदाजी क्रमवारीत आदिल रशीदने पहिला क्रमांका कायम राखला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर वानिंदु हसरंगा आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल चौथ्या तर रवी बिश्नोई पाचव्या क्रमांकावर आहे. पण या दोघांच्या व्यतिरिक्त टॉप-20 मध्ये एकही भारतीय गोलंदाजी नाही.

एकदिवसीय क्रमवारीत बदल

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत काही बदल झाले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा झाला आहे. रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय. तर श्रीलंकेचा पाथुम निसांका 8व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी एक स्थानाने पुढे जात सहाव्या क्रमांकावर पोहोचलाय.

आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम कायम आहे. तर पुढच्या तीनही क्रमांकावर भारतीय फलंदाजांचा दबदबा आहे. दुसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली तर चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. 

2024-03-21T08:55:53Z dg43tfdfdgfd