IND VS ENG 5TH TEST : इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात दोन बदल, देवदत्त पडिक्कलचे पदार्पण

India Vs England 5th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने बुधवारीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. ऑली रॉबिन्सनच्या जागी मार्क वुडने प्रवेश केला आहे. त्याचवेळी देवदत्त पडिक्कल भारतासाठी पदार्पण करत आहे. रजत पाटीदारच्या जागी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर रविचंद्रन अश्विनचा हा १०० वा सामना आहे. कर्णधार रोहित म्हणाला की, संघात दोन बदल केले आहेत. पडिक्कलशिवाय जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. आकाश दीपच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. रोहितने सांगितले की, बुधवारी संध्याकाळी सराव करताना रजतला दुखापत झाली. धरमशाला येथील हवामान पाहता, येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी ठरतील, अशी अपेक्षा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला होती, परंतु खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर स्टोक्सने आपला प्लॅन बदलला. त्यांनी दोन वेगवान गोलंदाजांसह दोन फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑली रॉबिन्सनच्या जागी मार्क वुडला परत आणण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेटपासून दोन विकेट्स दूर असलेल्या जेम्स अँडरसनसह तो गोलंदाजीचे नेतृत्व करेल. फिरकी विभागात रांची कसोटीत आठ विकेट घेणारे ऑफ-स्पिनर शोएब बशीर आणि टॉम हार्टली जबाबदारी सांभाळतील. इंग्लंडने रॉबिन्सनच्या रूपाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :

इंग्लंड : झॅक क्रॉउली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), शोएब बशीर, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सरफराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

2024-03-07T03:58:43Z dg43tfdfdgfd