IPL 2024 MI VS RR: सामना चालू असतानाच चाहता मैदानात आला आणि रोहित शर्मा घाबरला; घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

IPL 2024, Mumbai Indians vs Rajasthan Royals: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ केवळ १२५ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सचा संघ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी उतरला तेव्हा रोहित मैदानावर असतानाच एकदम दचकला, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. वानखेडे मैदानावरील सुरक्षेला चकवा देत एका प्रेक्षकाने मैदानात लाइव्ह सामन्यात प्रवेश केला.स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहितला मागून एका चाहत्याने येऊन मिठी भेटण्याचा प्रयत्न केला आणि त्याची गळाभेट घेतली. तर त्याने नंतर इशान किशनची गळाभेट घेत आनंद साजरा केला.

रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक इशान किशन स्लिपमध्ये उभे होते. तेवढ्यात त्यांच्या मागून एक चाहता धावत आला. त्याला पाहून रोहित शर्मा अचानक घाबरला, मग तो प्रेक्षक असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो रोहितला काहीतरी सांगितले आणि मग त्याला मिठी मारली. यानंतर त्याने सोबत उभ्या असलेल्या ईशान किशनचीही गळाभेट घेतली आणि स्वतःही बाहेर जाण्यासाठी धावत निघाला. तितक्यात सुरक्षारक्षक त्याच्याजवळ धावत आले आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.

राजस्थानचा मुंबईवर सहज विजय

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला फक्त १२५ धावा करता आल्या आणि संघाची फलंदाजी फळी चांगलीच फ्लॉप ठरली. ट्रेंट बोल्टने रोहित शर्मासह ३ आघाडीच्या फलंदाजांना गोल्डन डकवर बाद केले. चहलनेही ३ विकेट घेत आपल्या स्पेलमध्ये केवळ ११ धावा दिल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने २७ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि ६ गडी राखून विजय मिळवला. रियान परागने ३९ चेंडूत ५४ धावांची नाबाद खेळी खेळत सर्वाधिक धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून देत माघारी परतला.

सलग ३ सामने गमावल्यामुळे आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत मुंबईची स्थिती खूपच खराब आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर आहे.तर दुसरीकडे, राजस्थान रॉयल्ससाठी मुंबईविरुद्धचा विजय हा सलग तिसरा विजय होता. ज्यामुळे राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

2024-04-02T04:33:08Z dg43tfdfdgfd