IPL 2024 SCHEDULE: IPL 2024चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; फानयल मॅच कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई: IPLच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2024चे संपूर्ण वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सोमवारी जाहीर केले. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आयपीएलच्या सर्व लढती भारतात होणार आहे. स्पर्धेतील ७४ लढती भारतात होतील.

साखळी फेरीतील लढती झाल्यानंतर प्लेऑफच्या लढती अहमदाबाद आणि चेन्नई येथे होणार आहेत. पहिली क्वॉलिफायर आणि एलिमिनेटरची लढत अनुक्रमे २१ आणि २२ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. तर दुसरी क्वॉलिफायर २४ मे रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर होणार आहे. अंतिम लढत २६ मे रोजी चेन्नईत होईल.

प्लेऑफच्या लढती अहमदाबाद आणि चेन्नईत होणे अपेक्षित होते. कारण गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात फायनल मॅच झाली होती. त्यामुळे या दोन्ही संघांच्या घरच्या मैदानाची निवड करण्यात आली आहे. या हंगामातील पहिली लढत चेन्नईत झाली होती.

बीसीसीआयने याआधी पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. आता त्यांनी ८ एप्रिलपासून होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केले. ज्याची सुरुवात देखील चेन्नई सुपर किंग्जच्या मॅचपासून होणार आहे. ८ एप्रिल रोजी चेपॉकवर त्यांची लढत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

2024-03-25T13:42:21Z dg43tfdfdgfd