IPL 2024: लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा झटका; BCCIने दिलेल्या बातमीने हार्दिक पंड्याची झोप उडाली

नवी दिल्ली: टी-२० क्रिकेटमधील नंबर एकचा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूर्या केल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामातील पहिल्या दोन लढतीत तो खेळू शकला नाही. सूर्या रिकव्हरीसाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. आता बोर्डातील सूत्रांनी सूर्याच्या फिटनेसवर अपडेट दिली आहे.

सूर्यकुमार यादववर स्पोर्ट्स हर्नियाची सर्जरी झाली आहे. मात्र तो अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. बोर्डातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्याचा फिटनेस चांगला आहे आणि लवकरच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसले. सुरुवातीचे दोन सामने तो खेळू शकला नाही आणि आणखी काही लढती तो खेळू शकणार नाही.

मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादवची कमतरता जाणवली. पण बीसीसीआयने या आक्रमक फलंदाजाच्या बाबत कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. कारण जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेत सूर्या टीम इंडियाचा हुकमी एक्का असेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय खरी काळजी ही आहे की सूर्या टी-२० वर्ल्डकप खेळू शकेल की नाही. सूर्या वर्ल्डकपच्या आधी फिट होईल यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरू आहेत. टी-२० मध्ये सूर्याने १७१.५५च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. भारतासाठी सूर्यकुमारने ६० टी-२०मध्ये चार शतकांसह २ हजार १४१ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिल्या लढतीत गुजरातकडून तर दुसऱ्या लढतीत हैदराबादकडून पराभव झाला आता त्यांची तिसरी लढत घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.अशात सूर्यकुमार यादवच्या फिटनेसची बातमी आल्याने मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हार्दिक पंड्याच्या टेन्शन आणखी वाढले आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T16:49:32Z dg43tfdfdgfd