IPL 2024 : सौरव गांगुलीने दिली 'गुड न्यूज', सांगितलं... 'या' तारखेला फिट होणार ऋषभ पंत!

Rishabh Pant In Delhi Capitals : इंडियन प्रीमिअर लीग 2024 च्या (IPL 2024) पहिल्या टप्प्यातील सामन्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स (CSK vs RCB) बंगळुरुदरम्यान खेळवला जाणार आहे. या आयपीएल हंगामास दिल्ली कॅपिटल्स आपल्या 23 मार्चपासून सुरूवात करेल. पंजाब किंग्जविरुद्ध दिल्लीचा सामना होणार आहे. मात्र, आता आयपीएलपूर्वी दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची धाकधूक वाढली आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता 5 मार्च 2024 ही तारीख पंतसाठी महत्त्वाची असल्याचे दिल्ली कॅपिटल्सचे डायरेक्टर सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) म्हटले आहे.

सौरव गांगुली काय म्हणाले?

ऋषभ पंत नक्कीच येत्या आयपीएलमध्ये खेळेल, अशी आशा मी व्यक्त करतो. 5 मार्च 2024 ही तारीख ऋषभ पंतसाठी महत्त्वाची आहे. ही तारीख त्याच्या कारकिर्दीला नवं वळण देणारी ठरणार आहे. 5 मार्च रोजी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) त्याला पुनरागमनासाठी तंदुरुस्त घोषित करू शकतं, अशी माहिती सौरव गांगुलीने दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सौरव गांगुलीने याचा खुलासा केला आहे.

राष्ट्रीय संघालाही ऋषभ पंतची उणीव भासत आहे. तो तरुण खेळाडू आहे आणि त्याच्या करिअरमध्ये बराच काही शिल्लक आहे. तो एक खास खेळाडू आहे आणि त्याने पूर्णपणे सावरण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे, असं वक्तव्य सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी केलं होतं.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा गेल्या वर्षी 30 डिसेंबरला भीषण अपघात झाला होता. नशीब चांगलं होतं म्हणून ऋषभ पंत एवढ्या मोठ्या अपघातातून (Rishabh Pant Accident) वाचला. गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ऋषभ आता रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पुन्हा जोमाने कामाला लागला अन् आता तो आयपीएलसाठी पूर्ण तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे आता येत्या 23 तारखेला ऋषभ नक्कीच मैदानात दिसेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ

ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, विक्की ओस्तवाल, कुमार कुशाग्र, सुमित कुमार, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, झाय रिचर्डसन, हॅरी ब्रूक, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, खलील अहमद, मिशेल मार्श, ईशांत शर्मा, यश ढुल, स्वास्तिक छिकारा, रिकी भुई, रसिख डार, प्रवीण दुबे, मुकेश कुमार.

2024-03-02T09:55:31Z dg43tfdfdgfd