IPL 2024च्या प्लेऑफची गॅरंटी कोणाला? CSK, SRHचे काही खरं नाही, सर्व संघांची समीकरणे एका क्लिकवर

मुंबई: आयपीएल २०२४मधील साखळी लढतीचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. स्पर्धेतील जास्ती जास्त ३ लढती शिल्लक असताना अद्याप एकाही संघाने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले नाही आणि सर्व संघांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता अद्याप आहे. अर्थात एकाही संघाने अधिकृतपणे त्याचे स्थान निश्चित केले नाही.

काल म्हणजे ७ मे रोजी झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर थरारक असा विजय मिळवला. कालच्या लढतीत जर राजस्थानने विजय मिळवला असता तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरला असता. आयपीएलच्या १७व्या हंगामातील प्लेऑफचे समीकरण अखेरच्या क्षणापर्यंत बदलू शकते.

सध्या गुणतक्त्यात कोलकात १६ गुणांसह अव्वल स्थानी, राजस्थान १६ गुणांसह दुसऱ्या, चेन्नई हैदराबाद, दिल्ली आणि लखनै प्रत्येकी १२ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. आरसीबी सातव्या, पंजाब आठव्या,मुंबई नवव्या तर गुजरात अखेरच्या तळाला आहेत. या सर्व संघांचे प्रत्येकी ८ गुण आहेत.

या दोघांना अव्वल स्थानी राहणाची संधी

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचे प्रत्येकी १६ गुण आहेत. शिल्लक ३ पैकी एक मॅच जिंकली तरी या दोन्ही संघांना प्लेऑफचे तिकीट मिळेल. या दोघांना १८ पेक्षा अधिक गुण मिळवण्याची संधी आहे. तर जास्ती जास्त ३ संघांना १८ गुणांपर्यंत पोहोचता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज, हैदराबाद आणि लखनौ एकाच बोटीत

चेन्नई, हैदराबाद आणि लखनौ यांचे प्रत्येकी ११ लढतीत १२ गुण आहेत. नेट रनरेटमुळे ते अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. तिघांना उर्वरित ३ लढती जिंकून १८ गुणांपर्यंत पोहोचता येईल. पण प्लेऑफच्या शर्यतीतून जवळ जवळ बाहेर पडलेल्या गुजरात, आरसीबी आणि राजस्थानविरुद्ध चेन्नईची कामगिरी कशी होते. हैदराबादची लढत लखनौ, गुजरात आणि पंजाब तर लखनौची लढत हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईविरुद्ध होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सची नॉकआउट सुरू

दिल्लीचा संघ सध्या गुणतक्तात पाचव्या स्थानावर आहे. शिल्लक २ लढतीत विजय मिळवल्यास त्यांचे १६ गुण होतील. मात्र तरी प्लेऑफचे तिकीट त्यांना मिळेल याची हमी नाही. कारण अन्य ३ संघांचे १६ गुण होऊ शकता. आणि तेव्हा नेट रनरेटवर सर्व काही ठरवले जाईल. अशात नशिबाने साथ दिली दिल्लीला प्लेऑफमध्ये जाता येईल. दिल्लीचा एक पराभव त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर करू शकतो.

आरसीबी, पंजाब आणि गुजरात

या तिनही संघ अडचणीत आहेत. आरसीबी आणि पंजाब पैकी एकच संघ १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. गुजरातच्या संघाला जास्ती जास्त १४ गुण मिळवता येतील.

मुंबई इंडियन्सला संधी पण अशक्य...

नवव्या स्थानावर असलेल्या मुंबईचे आव्हान संपुष्टात आले आहे. ते जास्ती जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. त्यानंतर मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर अन्य ६ संघांच्या लढतीचे निकाल त्याच्या सोईनुसार लागले पाहिजेत, जी गोष्ट अशक्य आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-08T12:14:03Z dg43tfdfdgfd