MI VS PBKS: मुंबई इंडियन्सचा पराभव पक्का होता; या दोघांच्या हुशारीने MIने बाजी पलटली, जगभर होत आहे कौतुक

नवी दिल्ली: आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने अखेरच्या षटकात पंजाब किंग्जचा पराभव केला. या लढतीत मुंबईने बाजी मारली असली तरी पंजाबच्या आशुतोष शर्मा आणि शशांक सिंह यांचे कौतुक करावे तितके कमीच होय. या दोघांनी मुंबईच्या हाती आलेला विजयाचा घास काढून घेतला होता. मुंबई इंडियन्सचा पराभव होणार हे स्पष्ट दिसत होते. अशात मुंबईच्या दोघा खेळाडूंनी केलेल्या हुशारीमुळे बाजी पलटली आणि विजय साकारता आला.

अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी १२ धावांची गरज होती. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर कगिसो रबाडाने शॉट खेळला आणि २ धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. नबीने केलेल्या रॉकेट थ्रो आणि इशान किशनने चपळाई समोर पंजाबच्या फलंदाजांची धाव कमीच पडली.

मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवाल अखेरची ओव्हर टाकत होता. पंजाबकडून रबाडा स्ट्राइकवर होता. त्याने चेंडू मारला जो सीमारेषेकडे केला. चौकार मिळाला नसला तरी त्यांनी दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि तेथेच मोठी चूक केली. मोहम्मद नबीने सीमारेषेवरून रॉकेटच्या वेगाने थ्रो केला. त्यानंतर इशान किशनने कोणताही चूक न करता चेंडू पकडला आणि विकेटला लावला. असे वाटत होते की रबाडा क्रीझमध्ये पोहोचला आहे. पण टीव्ही रिप्लेमध्ये मुंबईच्या दोन खेळाडूंची कमाल संपूर्ण जगाने पाहिली. रबाडा धावबाद झाला आणि मुंबईने मॅच ९ धावांनी जिंकली.

]]>

त्याआधी मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १९३ धावा केल्या होत्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५३ चेंडूत सर्वाधिक ७८ धावा केल्या. फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या पंजाबची अवस्था ४ बाद १४ अशी झाली होती. पण शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा यांनी पंजाबला विजयाच्या दारापर्यंत पोहोचवले.

शशांकने १६४च्या स्ट्राइक रेटने २ चौकार आणि ३ षटकारांसह २५ चेंडूत ४१ तर शर्माने २१७च्या स्ट्राइक रेटने २८ चेंडूत ६१ धावा ठोकल्या. ज्यात २ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने २१ चेंडूत ३ विकेट घेतल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-19T11:11:06Z dg43tfdfdgfd