MI VS RR: वानखेडेमध्ये आज खरंच हार्दिकमुळे पोलीस चाहत्यांवर कारवाई करणार? MCA म्हणालं, 'प्रेक्षकांच्या..'

IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Roylas: इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या पर्वामध्ये आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. यंदाच्या वर्षीचा हा मुंबईतील कोणत्याही मैदानावरील पहिलाच आयपीएल सामना असणार आहे. त्यामुळे मुंबईकर क्रिकेट चाहत्यांमध्ये याबद्दल बरीच उत्सुकता आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ काही दिवसांपूर्वीच शहरात दाखल झाला असून जोरदार सराव सुरु आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा हा सामना रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतरचा मुंबईतील पहिलाच समाना आहे. त्यामुळेच मागील काही सामन्यांमध्ये नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्याची हुर्यो उडवली गेल्याने आजच्या सामन्यात विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याच्या बात्या समोर आल्या होत्या. पंड्याला मुंबईकर क्रिकेट चाहत्यांकडून विरोध सहन करावा लागू शकतो असा अंदाज असल्याने विशेष सुरक्षा देण्यात आली असून पंड्याला डिवचणाऱ्यांवर पोलिसांचं लक्ष असणार आहे वर पोलीस अशा प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढतील अशा संदर्भातून बातम्या समोर आल्यानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. खरोखरच आज वानखेडेच्या मैदानात पोलीस विरुद्ध चाहते असा संघर्ष रंगाणार का?

नेमक्या कोणत्या बातम्यांमुळे हा सामना चर्चेत?

मुंबई इंडियन्सच्या संघाचे पुढील 4 सामने वानखेडेमध्ये होणार असल्याने पंड्याला चाहत्यांकडून पुन्हा टार्गेट केलं जाण्याची शक्यता लक्षात घेता विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याचा दवा करण्यात आलेला. मुंबईकर चाहत्यांकडून आयपीएल सामन्यादरम्यान मैदानात पंड्याला त्रास दिला जाण्याची शक्यता असल्याने कठोर निर्णय घेतल्याचा दावा केला गेला. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हार्दिकविरुद्ध घोषणाबाजी होऊ वानखेडेमधील सामन्यात गोंधळ होऊ शकतो या शक्यतेच्या आधारावर मैदानातील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांचं चाहत्यांवर लक्ष असणार आहे. पंड्याला चिडवणाऱ्या, डिवचणाऱ्या किंवा त्याच्याविरुद्ध अयोग्य शब्दप्रयोग करताना आढळून आल्यास अशा क्रिकेट चाहत्यांविरोधात एमसीएकडून कारवाई केली जाईल किंवा अशा हुल्लडबाज प्रेक्षकांना मैदानातून बाहेर काढलं जाईल, अशा बातम्या समोर आल्या.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने काय म्हटलं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनने म्हणजेच एमसीएने रविवारी मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यादरम्यान हार्दिक पंड्याची हुर्यो उडवली जाऊ नये आणि गोंधळ होऊ नये म्हणून विशेष पोलीस सुरक्षा व्यवस्था ठेवल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. यासंदर्भातील बातम्या केवळ अफवा असल्याचं एमसीएने स्पष्ट केलं आहे. "या ठराविक सामन्यासाठी कोणत्याही विशेष सूचना करण्यात आलेल्या नाहीत. प्रेक्षकांच्या वागणुकीसंदर्भात बीसीसीआयने फार पूर्वीच नियमावली जारी केलेली आहे. मागील अनेक वर्षांपासून ही नियमावली अस्तित्वात आहे. त्याच नियमावलीनुसार परिस्थिती हाताळली जाईल," असं एमसीएने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> IPL 2024 Points Table मुंबई तळाशी! आजच्या सामन्यात थेट 5 व्या स्थानी उडी घेण्याची संधी पण..

रोहित पायउतार झाल्यानंतर पहिलाच सामना

रोहितने मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोडल्यानंतर 1 एप्रिल रोजी होणारा मुंबईचा सामना हा होम ग्राऊण्डवरील पहिला सामना ठरणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहितच मुंबईचा खरा कर्णधार आहे, रोहितच आमच्यासाठी आजही कर्णधार आहे असा अर्थाचे पोस्टर्स मैदानात झळकल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे मुंबईच्या मैदानावरील या पहिल्याच सामन्यात रोहित तसेच मुंबईच्या चाहत्यांकडून हार्दिकविरुद्ध घोषणाबाजी, पोस्टरबाजी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 

2024-04-01T06:36:03Z dg43tfdfdgfd