MS DHONI : 'क्रिकेट म्हणजे आयुष्य नसतं..', जहीर खानने टोचले धोनीचे कान, सल्ला देत म्हणाला...

Zaheer Khan on MS Dhoni : धोनी विलचेअरवर असला तरी सीएसकेचा (CSK) संघ त्याला खेळण्याची संधी देईल, असं म्हणत रॉबीन उथप्पाने धोनीच्या निवृत्तीविषयी रंजक विधान केलं होतं. त्यानंतर धोनी वय झालं तरी निवृत्ती का घेत नाही? असा सवाल क्रिडाविश्वात विचारला जात आहे. गेल्या दोन वर्षापासून धोनीच्या निवृत्तीची (MS Dhoni Retirement) चर्चा होताना दिसते. मात्र, धोनीने यंदाही पुन्हा तयारी करून मैदानात आल्याने चाहत्यांचा आनंद दुप्पट झालाय. अशातच आता टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्टार गोलंदाज जहीर खान (Zaheer Khan) याने धोनीचे कान टोचत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाला जहीर खान?

महेंद्रसिंग धोनीला खूप आधीच समजलं होतं की, त्याच्यामध्ये क्रिकेट खेळण्याची कला आहे आणि क्रिकेट त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण असं असू शकत नाही की, क्रिकेटच सर्वकाही असेल. जेव्हा आपण खेळत असतो, तेव्हा स्विच ऑफ होणं देखील तितकंच गरजेचं असतं. क्रिकेट म्हणजे सर्वकाही नसतं. प्रत्येक क्रिकेटरला याचा सामना करावाच लागतो. जेव्हा तुम्ही खेळापासून दूर असता तेव्हा बरेच पर्याय नसतात. आपण अनेक खेळाडूंना निवृत्तीनंतर संघर्ष करताना पाहिलंय. कारण ते आपलं सर्वस्व खेळासाठी देतात आणि जेव्हा ते खेळापासून वेगळे होतात तेव्हा त्यांना काय करावं हेच कळत नाही, असं जहीर खान म्हणाला आहे.

धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार?

यंदाची आयपीएल त्याची शेवटची आयपीएल असेल की नाही? हे मला माहित नाही. बघा, हा चेन्नईच्या कर्णधाराचा प्रश्न आहे, तोच तुम्हाला सरळ उत्तर देईल, असं न्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ (CSK CEO Kasi Viswanathan) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे धोनी आगामी हंगामात देखील आयपीएल खेळणार का? असा सवाल विचारला जातोय.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ - अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉन्वे (out), महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल,समीर रिझवी ,शार्दूल ठाकूर , मुस्तफिजुर रहमान.

CSK चे पहिल्या टप्प्यातील सामने

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता

2024-03-20T13:24:02Z dg43tfdfdgfd