POLL: बस्स झालं आता! सलग ३ पराभवानंतर मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलावा का?

मुंबई: आयपीएलची ५ विजेतेपदे, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ, फलंदाजी आणि गोलंदाजीची धाक अशी की समोरचा संघ मैदानात उतरण्याआधीच घबरलेला असतो. मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएलमधील दबदाबा असा आहे. संघाला २०१३ पासून ते २०२० पर्यंत पाच विजेतेपद मिळून देणाऱ्या रोहित शर्माच्या जागी या वर्षी हार्दिक पंड्याकडे नेतृत्व देण्यात आले. संघ मालकांच्या या निर्णयाला पहिल्यापासून विरोध झाला आणि आता त्याची तीव्रता वाढली आहे कारण चॅम्पियन संघात सर्व काही ठीक असल्याचे दिसत नाही. हार्दिक पंड्याने पहिल्या ३ लढतीत घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. आता हंगामाची सुरुवात आहे, मुंबई संघ कमबॅक करू शकतो. त्यासाठी कर्णधारपद पुन्हा रोहितकडे द्यावे का? तुम्हाला काय वाटते? खालील पोलवर मत देऊन तुमची प्रतिक्रिया कळवा.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-02T13:15:51Z dg43tfdfdgfd