RANJI TROFY FINAL 2024: रणजी फायनलमध्ये श्रेयसच्या फलंदाजीमुळे धुमाकूळ, दमदार फटकेबाजीने दिले टीकेला चोख प्रत्युत्तर

मुंबई : भारतीय संघातील फलंदाज श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून वाईट फॉर्मचा सामना करत होता. त्याला इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत पहिल्या २ कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. मात्र, तो या सामन्यात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीची बरीच चर्चा झाली. यानंतर श्रेयसवर टीकेची झोड उठली होती. मात्र, आता रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत विदर्भाविरुद्ध मुंबईकडून अय्यरने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली आहे. त्याने या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

फॉर्म परत मिळवत केले अर्धशतकमुंबई आणि विदर्भ यांच्यादरम्यान सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी फायनल सामन्यात श्रेयस आय्यरने तुफान फलंदाजी केली आहे. शानदार खेळी करुन आऊट झालेला फलंदाज अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर तो मैदानात आला. अय्यरने तुफानी फलंदाजी करताना आपले अर्धशतक पूर्ण केले. एवढेच नाही तर अय्यर अजूनही नाबाद आहे. तो ९० च्या स्ट्राईक रेटने ७५ चेंडूंचा सामना करत ६८ धावा करत आहे. श्रेयस अय्यरनेही आपल्या खेळीत आतापर्यंत ८ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.

अजिंक्य राहणेच्या खेळीमुळे मुंबईने उभा केला धावांचा डोंगरमुंबईचा कर्णधार आणि भारतीय संघाचा क्रिकेटपटू हा देखील निराशाजनक फॉर्मचा सामना करत होता. संपूर्ण स्पर्धेत शांत राहिलेल्या त्याच्या बॅटने फायनलमध्ये जोरदार स्पीड पकडला. अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावात १४३ चेंडूंचा सामना करत ७३ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकारही लगावला. सध्या अय्यर आणि रहाणे हे दोघेही भारतीय संघाबाहेर आहेत. श्रेयस अय्यरने भारतासाठी १४ कसोटीत ८११ धावा केल्या आहेत तर अजिंक्य रहाणेने ८५ कसोटीत ५०७७ धावा केल्या आहेत.

2024-03-12T08:24:17Z dg43tfdfdgfd