RANJI TROPHY FINAL : विदर्भाने केलं मध्य प्रदेशाचे स्वप्नभंग, रणजी ट्रॉफी फायनलमध्ये तगड्या मुंबईशी महामुकाबला

Ranji Trophy 2024 Final : रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात मुंबई आणि विदर्भ हे दोघं आमने-सामने भिडणार आहेत. मुंबईने आधीच सेमी फायनलमध्ये तामिळनाडूचा धुव्वा उडवत थाटात फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर, विदर्भाने मध्यप्रदेशाला 62 धावांनी धुळ चारून फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात झालेल्या सेमाफायनलचा निकाल मॅचच्या शेवटच्या दिवशी लागला होता. सेमीफायनलच्या पाचव्या दिवशी विदर्भ आणि मध्यप्रदेश हे दोन्ही संघ एकमेकांना कडवी झुंज देत असताना, विदर्भाला 4 विकेट्सची तर मध्यप्रदेशला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी 93 धावांची गरज होती, पण विदर्भाच्या गोलंदाजांनी मध्य प्रदेशाच्या फलंदाजांना दिवसाच्या सुरूवातीलाच गुंडाळले आणि विदर्भाला 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचवले.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदा असं होणार..!

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच असं होणार आहे की, एकाच राज्याचे दोन संघ रणजी ट्रॉफीच्या फायनमध्ये पोहोचले आहेत. याआधी 1971 ला पहिल्यांदा असं झालं होत, जेव्हा मुंबईने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये महाराष्ट्राला हरवलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच दोन एकाच राज्याचे संघ रणजी ट्रॉफी 2024 च्या फायनलमध्ये लढणार आहे.  

विदर्भाने केला शानदार पलटवार 

विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात झालेल्या सेमीफायनलमध्ये, विदर्भाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि पहिल्या इनिंगमध्ये विदर्भाचा संघ फक्त 170 पर्यंतच मजल मारू शकला, यानंतर मध्यप्रदेशाच्या फलंदाजांनी एकूण 252 धावा केल्या होत्या. पण शेवटच्या इनिंगमध्ये यश राठौडच्या 141धावांच्या च्या मदतीने विदर्भाने 402 धावांचा डोंगर उभा केला होता. टेस्ट मॅचच्या शेवटच्या इनिंगमध्ये मध्यप्रदेश संघाला रणजी ट्रॉफी फायनमध्ये प्रवेश करण्यासाठी 320 धावांची गरज होती पण विदर्भाच्या गोलंदाजीसमोर मध्यप्रदेशाच्या फलंदाजांचे प्रयत्न कमी पडले आणि विदर्भाने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर रणजी ट्रॉफी 2024 च्या फायनमध्ये जागा निश्चित केली. 

 

दरम्यान, 10 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळला जाणार आहे. 

मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे (कर्णधार), सरफराज खान, शिवम दुबे, सुवेद पारकर, शमस मुलानी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), जय बिस्ता, भूपेन लालवाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर.

विदर्भाचा संघ - अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), आदित्य सरवटे (उपकर्णधार), फैज फजल, ध्रुव शोरे, करुण नायर, आर. संजय, शुभम दुबे, दर्शन नालखंडे, अक्षय वाखरे, हर्ष दुबे, यश ठाकूर, यश राठोड, सिद्धेश वाठ (विकेटकीपर), ललित यादव, उमेश यादव, मोहित काळे, आदित्य ठाकरे.

 

2024-03-06T09:51:44Z dg43tfdfdgfd