RCB VS PBKS : बंगळुरूच्या मैदानात चालली विराटची रनमशिन, आरसीबीकडून विजयाचा श्रीगणेशा!

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा 6 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने पंजाबचा 4 गडी राखून पराभव केला. कोहलीच्या विराट खेळीनंतर (Virat Kohli) दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) फिनिशिंग टच दिला अन् आयपीएलच्या 17 व्या हंगामात खातं उघडलं. अखेरच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने एक सिक्स अन् एक फोर मारला अन् विजय खिशात घातला. पंजाबकडून कॅप्टन शिखर धवनने 45 धावांची खेळी केली तर हरप्रीत ब्रार (Harpreet Brar) आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

आरसीबीने दिलेलं 177 धावांचं आव्हान पार करताना आरसीबीला चांगली सुरूवात मिळाली नाही. एकीकडून विराट कोहली आक्रमक खेळत असताना दुसऱ्या बाजूने आरसीबीच्या विकेट्स पडत गेल्या. कॅप्टन फाफ आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी 3 धावा केल्या. त्यामुळे विराट कोहलीच्या खांद्यावर आरसीबीची जबाबदारी आली. अखेरच्या 10 ओव्हरमध्ये बंगळुरूला 92 धावांची गरज होती. विराट कोहलीने झुंजार खेळी केली. विराटने 49 बॉलमध्ये 77 धावा केल्या. यामध्ये त्याने 11 फोर अन् 2 सिक्स मारले. अखेर दिनेश कार्तिक अन् इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या महिपाल लोमरोरने पंजाबच्या खिशातून सामना काढला. डीकेने 10 बॉलमध्ये 28 धावांची खेळी केली. तर महिपाल लोमरोरने 8 बॉलमध्ये 17 धावा करत सामन्यावर इन्पॅक्ट गाजवला. 

आयपीएलच्या सहाव्या सामन्यात पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पहिली फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 6 विकेट गमावत 177 धावा केल्या. पंजाबतर्फे कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर जितेश शर्माने 27 आणि प्रभसिमरन 25 आणि सॅम करनने 23 धावा केल्या. बंगळुरुतर्फे मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर यश दयाल आणि अल्झारी जोसेफने प्रत्येकी एक विकेट घेतली. पंजाबकडून आक्रमक गोलंदाजी सुरू असताना 12 आणि 13 व्या ओव्हरमध्ये सलग दोन विकेट्स पडल्याने पंजाब बॅकफूटवर गेली. त्यानंतर अखेरच्या फलंदाजांना मोठी कामगिरी करता आली नाही. शशांक सिंग दोन सिक्स मारले अन् पंजाबला 176 धावांवर पोहोचवलं. 

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (C), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

2024-03-25T17:50:51Z dg43tfdfdgfd